Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर; मतदान, निकाल कधी?

Delhi Vidhansabha Elections : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (७ जानेवारी) रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्ली विधानसभा निवडणूकांची अधिकृत घोषणा दिली.
Delhi Legislative Assembly Elections
Delhi Legislative Assembly ElectionsSakal
Published On

Delhi Legislative Assembly Elections: केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या. ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. 

राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांसंबंधित घोषणा दिली. दिल्लीमध्ये ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी २०२५ ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. दिल्लीत एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.

निवडणुकांसंबधित महत्त्वपूर्ण तारखा :-

१७ जानेवारी - उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस

१८ जानेवारी - उमेदवारी अर्जाची तपासणीचा दिवस

२० जानेवारी - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवस

५ फेब्रुवारी - मतदानाचा दिवस

८ फेब्रुवारी - मतमोजणी आणि निकालाचा दिवस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला बहुमत मिळाले होते. राज्यात २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीला फक्त ५० जागांवर समाधान मानावे लागले. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमद्वारे मतदान केल्यावरुन शंका उपस्थित केल्या होत्या. आज निवडणूक आयोगाने या मुद्दयावरही भाष्य केले. ईव्हीएम हॅक करता येत नाही असे आयोगाने स्पष्ट केले.

Delhi Legislative Assembly Elections
HMPV Virus Cases : विमानतळावर तपासणी कधी सुरु करणार? पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर

राजधानी दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. तर दिल्लीचा गड जिंकण्याच्या प्रयत्नात भारतीय जनता पक्ष आहे. तेव्हा दिल्लीमध्ये निवडणुकीच्या दरम्यान भाजप विरुद्ध आप असा सामना रंगला जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.

Delhi Legislative Assembly Elections
HMPV Virus: अलर्ट! व्हायरसविरोधी राज्यात टास्क फोर्सची स्थापना, कशी केली जाणार टेस्ट पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com