Fact Check: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला?

Fact Check Amit Shah on Ambedkar : राज्यसभेतील अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडिओ खोटा आहे. शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा खोटा असल्याचं पीआयबीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
Fact Check Video  Of Amit Shah
Amit Shah on AmbedkarBusiness
Published On

विरोधी पक्षांकडून अमित शहा यांच्यावर टीका केली जाते. राज्यसभेतील भाषणादरम्यान गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी अमित शहा यांच्या भाषणातील शब्दांवर आक्षेप घेतलाय. भाजप गेल्या तीन वर्षांपासून महापुरुषांचा अपमान करत आहे. अमित शहा यांनी उर्मटपणाने महामानव आंबेडकर यांचा अपमान केलाय.

पंतप्रधान मोदी त्यांच्यावर कारवाई करतील का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शहांवर टीका केलीय. विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेला दावा भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष फेटाळून लावत आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. त्यांच्या भाषणाची एक खास क्लिप कापून ती सोशल मीडियावर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

Fact Check Video  Of Amit Shah
Uddhav Thackeray On Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, थेट पीएम मोदींना केला सवाल

भाजप, काँग्रेस पक्ष आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपानंतर पीआयबीने या प्रकरणाची सत्यता तपासलीय. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेकमध्ये म्हटले की, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.” या फॅक्ट चेकमध्ये पीआयबीने व्हायरल होणारा व्हिडिओ आणि ओरिजनल भाषणाचा व्हिडिओही शेअर केलाय.

या फॅक्ट चेकनंतर पीआयबीने म्हटले की, सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणातील निवडक भाग क्लिप केलेल्या व्हिडिओमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलाय.

काय आहे अमित शहा यांचा व्हिडिओ

महोदय, आता एक फॅशन झालीय… आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… इतक्यावेळी देवाचं नावं घेतलं असतं तर तुम्हाला विरोधकांना सात जन्म स्वर्ग मिळाला असता. आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांचं नाव शंभर पटीने घ्या, याचा आम्हाला आनंद आहे, पण आंबेडकरांविषयी तुमची भावना काय आहे हे मी सांगतो.

महोदय, आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला? आंबेडकर यांनी अनेकवेळा म्हणाले की, मी अनुसूचित जाती आणि जमातींना दिलेल्या वागणुकीबद्दल असमाधानी आहे. मी सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहे आणि मी कलम 370 शीअसहमत आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता. आश्वासन पूर्ण झाले नसल्याने आणि दुर्लक्षित केलं जात असल्याने आंबेडकर यांनी राजीनामा दिल्याचं अमित शहा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com