Uddhav Thackeray On Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, थेट पीएम मोदींना केला सवाल

Uddhav Thackeray Criticizes Amit Shah: बाबासाहेब आंबेडकर याच मनोविकृतीला कंटाळले होते. याच त्रासातून त्यांनी धर्मांतर केलं. भाजपची मनोविकृती आता समोर आली आहे.
Uddhav Thackeray on Amit Shah
Uddhav Thackerayyandex
Published On

राज्यसभेत 'अभी यह फॅशन चल गया आहे. अंबेडकर अंबेडकर नाम लेने का? इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता' असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजप नावाचा उर्मट पक्ष हा महापुरूषांचा अपमान करीत आहे. असं म्हणत त्यांनी हल्ला चढवला.

गेले अडीच वर्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उर्मट नेते महाराष्ट्रातल्या महापुरूषांचा अपमान करीत आहेत. जे सहनशीलतेच्याही पलिकडे गेले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोश्यारी यांनी केला होता. आम्ही या विरूद्ध मोर्चेही काढले होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपातील नेते आणि अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली.

Uddhav Thackeray on Amit Shah
Uddhav Thackeray : निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ २१०० रूपये द्या - ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश आहे, असं त्यांना वाटतं. आता कहर झाली आहे. ज्यांनी संविधान लिहिले, महामानव आंबेडकर यांच्यावर अमित शहा बोलले. संघाशिवाय भाजप बोलू शकत नाहीत. यांना मोदी मोदी करून स्वर्ग भेटणार आहे का? ज्यांनी देशाला घटना दिली, त्या देशाच्या महामानवाचा त्यांनी अपमान केला आहे.

आंबेडकारांचं नाव घेणं फॅशन झाली आहे. असा उद्दाम उल्लेख त्यांनी केला. हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे. मुंह में राम आणि बगल में छुरी, असं त्याचं हिंदुत्त्व आहे. असं म्हणत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray on Amit Shah
Amit Shah : खटाखट आश्वासनं देऊन विदेशात जातात; अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रामदास आठवले काय करीत आहेत? रामदास आठवले यांना बाबासाहेबांचा झालेला अपमान मान्य आहे का? ते आता काय करणार आहेत? राजीनामा देणार का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच नितीश कुमार, चंद्राबाबू काय करत आहेत? भाजपसोबत आमचे मिंधे गेले, आणि अजित पवारांना बाबासाहेब यांचा अपमान मान्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बाबासाहेब आंबेडकर याच मनोविकृतीला कंटाळले होते. याच त्रासातून त्यांनी धर्मांतर केलं. भाजपची मनोविकृती आता समोर आली आहे. माझे आजोबा बाबासाहेबांबरोबर उभे राहिले. मनोविकृती विरूद्ध लढा दिला आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com