पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं
Narendra Modi News Saam tv

PM Modi podcast: पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं

PM Modi Podcast Debut Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान मोदी यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं. निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये मोदींनी नाव सांगितलं.
Published on

नवी दिल्ली : 'माझा आता बालपणीच्या मित्रांसोबत संपर्क राहिला नसल्याचं भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. निखिल कामत यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये गप्पा मारताना हे त्यांनी सांगितलं. 'मी कमी वयात घर सोडलं, त्यामुळे शाळेतील मित्रांशी संपर्क राहिला नाही. माझ्या आयुष्यात आता तू म्हणणारा एकही व्यक्ती राहिला नाही. पण मला तू म्हणून बोलणारे एक व्यक्ती होते, असं म्हणत पंतप्रधान त्या व्यक्तीची आठवण सांगितली.

पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं
PM Kisan Yojana: नवरा-बायको दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? वाचा नियम काय सांगतो

'मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शाळेतील मित्रांना बोलवण्याची इच्छा होती. मी बोलावल्यानंतर ३५ जण आले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आधीसारखं वाटलं नाही. मला जास्त आनंद आला नाही. मी त्यांच्यामध्ये मित्र शोधत होतो. तर ते मला मुख्यमंत्री म्हणून पाहत होते. मला हे अंतर पटलं नाही. माझ्या आयुष्यात तू म्हणून बोलणारा व्यक्ती कोणी राहिला नाही, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

'मला बहुतेक लोक औपचारिक भाषेत बोलतात. तू म्हणून बोलणारा एकही व्यक्ती आयुष्यात राहिला नाही. माझे एक शिक्षक होते, त्यांचं नाव रासबिहारी मणियार असे होते. ते मला पत्र लिहायचे. ते पत्रात मला तू म्हणून बोलायचे. त्यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. ते शेवटचे आणि एकमेव व्यक्ती होते. तेच मला एकेरी हाक मारायचे, असेही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं
Modi Government: नव्या वर्षात मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

'मी गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यावर माझी दुसरी इच्छा होती की, माझ्या सर्व शिक्षकांचा सार्वजनिकरित्या सन्मान करण्याची इच्छा होती. मी शिक्षकांना शोधलं. त्यानंतर त्यांचा सन्मान केला. माझ्या मनात एकच विचार होता की, मी जो काही आहे, हे माझ्या शिक्षकांच्या योगदानामुळे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांना तू म्हणणारा जगात एकमेव व्यक्ती; मोदींनी स्वत: पॉडकास्टमध्ये नाव सांगितलं
PM Modi Podcast : मी रंग बदलणारा माणूस नाही! - नरेंद्र मोदी

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 'मी शाळेत फार हूशार नव्हतो. परंतु माझे शिक्षक मला अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. मी नेहमी हीच बाब लक्षात ठेवली आहे की,मिशनसोबत काम केलं पाहिजे. आजचं राजकारण पाहायला गेलं तरी, त्यात महात्मा गांधी कुठे फिट बसतात? त्यांचं राहणीमान साधं होतं. तरीही ते आज महान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोललं जातं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com