PM Modi Podcast : मी रंग बदलणारा माणूस नाही! - नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Podcast : झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या 'People By WTF' या पॉडकास्ट चॅनलला मोदींनी भेट दिली. या पॉडकास्टमध्ये त्यांनी विविध विषयांवरील गप्पा मारल्या.
PM Narendra Modi Podcast
PM Narendra Modi Podcast X (Twitter)
Published On

PM Modi Podcast Debut Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला पॉडकास्ट प्रदर्शित झाला आहे. झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या 'People By WTF' या पॉडकास्ट शोला त्यांनी भेट दिली. या मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींनी राजकारणापासून समाजकारणापर्यंत अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. बोलताना त्यांनी फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

निखिल कामथ यांच्या नरेंद्र मोदींना बालपणाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा मोदींनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, गुजरातच्या मेहसानामधील वडनगरमध्ये माझा जन्म झाला. त्यावेळी तेथील जनसंख्या फक्त १५,००० इतकी होती. लहान असताना मी घरातल्या प्रत्येकाचे कपडे धुवायचो, कारण त्या बहाण्याने मला तलावावर जायचा संधी मिळायची.

पुढे त्यांनी युवास्थता, राजकारणात प्रवेश ते गुजरातचे मुख्यमंत्रीपद यावर भाष्य केले. ते म्हणाले, "गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर मी अधिक मेहनत करायचा निर्धार केला. मी निस्वार्थपणे काम करायचे ठरवले. स्वत:साठी काहीही करणार नाही. हाच माझ्या जीवनाचा मंत्र बनला आहे. मी सुद्धा सामान्य माणूस आहे. मी देव नाही. माझ्याकडूनही चुका झाल्या आहेत. मी रंग बदलणारा व्यक्ती नाही."

PM Narendra Modi Podcast
Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!

"भाषण कलेपेक्षा संवाद जास्त आवश्यक असतो. तुम्ही संवाद कशाप्रकारे साधता, समोरच्याशी कसे बोलता ते महत्त्वाचे असते. महात्मा गांधी आपल्या सोबत काठी ठेवायचे. पण अहिंसेच्या गोष्टी करायचे. त्यांनी कधीही टोपी घातली नाही, पण जगभरात ती टोपी गांधीटोपी म्हणून ओळखली जाते. ही त्यांच्या संवादकौशल्याची शक्ती होती. त्यांनी कधीही निवडणुका लढवली, ते कधी सत्तेतही नव्हते. पण मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीस्थानाला राजघाट असे नाव देण्यात आले" असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी संवादकौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले.

PM Narendra Modi Podcast
Maharashtra Politics: विधानसभेला साथ सोडली, आता पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक; वरिष्ठ नेता घरवापसी करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com