Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!

Sanjay Raut On Maha Vikas Aghadi: विधानसभा निवडणुकीदरम्यान जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बरेच मतभेद झाले होते. त्याची खंत आता व्यक्त केली जात आहे. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले होते त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!
Mahavikas Aghadi Seat Allocation Formulathe Quint
Published On

विधानसभा निवडणुकीदरम्यान जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद झाले. जागावाटपाची प्रक्रियेला उशिर झाला होता. तिन्ही पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत वेगवेगळ्या जागांवर अडून बसले होते. अनेक मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा शेवटच्या क्षणाला करण्यात आली त्यामुळे प्रचाराला वेळ कमी मिळाला. याचा फटका महाविकास आघाडीला विधानसभेला बसला.

'विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता तर प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला असता. मात्र जागावाटपात सगळा घोळ घातला गेला. विनाकारण वेळ वाया घालवला,' असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट विजय वडेट्टीवार यांनाच जागावाटपाची प्रक्रिया का लांबली हे माहिती असावे असे वक्तव्य केले. यावरून आता महाविकास आघाडीमध्ये धुसफूस होत असल्याचे समोर येत आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'जागावाटपाची प्रक्रिया उगाच लाबंवली, हे आमचं सर्वांचं मत आहे. ती का लाबंली हे वडेट्टीवारांना माहिती असावं. महायुतीचं जागावाटप आमच्या २ महिने आधीच संपलं होत. वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे. होय, चुका झाल्या पण आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.'

Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!
Maharashtra Politics: विधानसभेला साथ सोडली, आता पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक; वरिष्ठ नेता घरवापसी करणार

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'काँग्रेसला सर्वात जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांच्या सर्वात कमी जागा निवडून आल्यात. विदर्भात वडेट्टीवारांनी काही जागा सोडल्या असत्या ज्या ते हरलेत तर चित्र काहीसं वेगळ असतं. जोरगेवाराबाबत आमचं स्पष्ट मत होतं, पण तसं झालं नाही. राष्ट्रवादीला ती जागा मिळाली नाही आणि जोरगेवार भाजपात गेले. याला सगळेच जबाबदार आहेत. कोल्हापूर उत्तर आम्ही मागत होतो, अशा अनेक जागा आहेत. पण कोणाला तरी राज्यात सर्वाधिक जागा लढवून मुख्यमंत्रीपद हवं होतं.'

Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!
Maharashtra Politics : अजित पवार गटासोबत जाणार का? रोहित पाटील स्पष्टच बोलले,VIDEO

शरद पवारांच्या नाराजीबद्दल संजय राऊत यांनी सांगितले की, 'महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीचीही बैठक व्हायला हवी होती. जी झाली नाही. याचा फटका सर्वांनाच बसला. इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती. पण प्रत्येकजण आपलंच घोडं दामटवत राहिला. आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती. तो सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पण त्यांना ते जमलेलं नाही. इंडिया आघाडी विसर्जित करणं हे फार मोठं विधान होईल.'

Maharashtra Politics: चूक, खंत आणि नाराजी; महाविकास आघाडीतील धुसफूस येतेय समोर, राजकारणात मोठं काहीतरी घडतंय!
Maharashtra Politics : पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? फडणवीस सरकारमधील बड्या नेत्याने केलं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com