Pimpri Chinchwad Breaking News: Saamtv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News: मालकाचा निष्काळजीपणा, निष्पापाचा जीव गेला! तरुणाचं शीर धडावेगळं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pimpri Chinchwad Breaking News: पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील स्टील यार्ड कंपनीत एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. स्टील यार्ड कंपनीत तील एका मशीनमध्ये अडकून एका कामगारांचा मुंडक पूर्णपणे धडावेगळं झाले आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका स्टील यार्ड कंपनीतील एका मशीनमध्ये अडकून एका कामगारांचा मुंडक पूर्णपणे धडा वेगळा झाला आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मोहनलाल जोखंनप्रसाद गौतम या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील स्टील यार्ड कंपनीत एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. स्टील यार्ड कंपनीत तील एका मशीनमध्ये अडकून एका कामगारांचा मुंडक पूर्णपणे धडावेगळं झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मोहनलाल जोखंनप्रसाद गौतम या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. स्टील यार्ड कंपनीमध्ये मशीन चालवायला योग्य प्रशिक्षक नव्हता तसेच कामगारावर देखरेख करणारा योग्य कामगारही नव्हता.

तरीही कंपनीच्या मालकांने आपल्या कंपनीतील कामगार मोहनलाल जोखंनप्रसाद गौतम याला कंपनीतील मशीन चालवायला लावली. त्यात मशीनमध्ये अडकून कामगार मोहनलाल जोखंनप्रसाद गौतम यांचे मुंडके पूर्णपणे धडावेगळे झाले आहे. या प्रकरणात चिखली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्टील यार्ड कंपनीचे मालक फैयाज उमर शेख आणि फारूक उमर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, यवतमाळमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने असलेल्या बोलेरो वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या पुसद दिग्रस रोडवर घडली. भरधाव वेगात असलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. मृताचे नाव कळू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

SCROLL FOR NEXT