सचिन जाधव, पुणे
Pune Crime News: मोबाईल काढून घेत त्यातील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने घराच्या काचा फोडत, आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. पुण्याच्या धनकवडी भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आईने सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार महिला ही पुण्यातील धनकवडी भागात राहते. त्यांच्यासोबत इयत्ता सातवीमध्ये शिकणारा त्यांचा १४ वर्षांचा मुलगा राहतो. सोमवार (ता. १४, ऑक्टोबर) फिर्यादी आणि त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये युट्युबवर एक मराठी मालिका पाहत होते. बराच वेळ दोघेही मालिक पाहात असल्याने फिर्यादी यांनी मुलाकडून मोबाईल घेत मालिका बंद केली.
मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आईवर चिडला, त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुण्यातून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांकडून एका दिवसात चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ३५ लाख ३ हजार १७७ रुपयांचा गंडा घातला आहे. चोरट्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन भरघोस नफा मिळवून देतो, ऑनलाईन टास्क जॉब देण्याचा बहाणा आणि इन्शुरन्स फंड जमा करण्याच्या तसेच टास्कच्या बहाण्याने ही फसवणूक केली असल्याच समोर आले आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी, चंदननगर, हडपसर, सहकारनगर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.