अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. या घटनेत त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
मंत्री तानाजी सावंत यांचे खासगी सुरक्षा रक्षक नितीन शिर्के यांचा कपाटातील रिव्हॉल्वरला धक्का लागला. त्यानंतर त्यांच्या रिव्हॉल्वरमधून घरातच गोळीबार झाला. या घटनेत सुरक्षा रक्षक यांचा १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनीत राहणारे खासगी सुरक्षा रक्षक नितीन शिर्के यांच्या विरोधात पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के लष्करातून निवृत्त झाले असून ते सध्या सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. ते मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर कार्यरत आहेत. नितीन शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी रिव्हॉल्वर कपाटातील एका पिशवीत ठेवली होती. रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. त्यांच्या मुलाने मंगळवारी दुपारी कपाट उघडले आणि त्याचा रिव्हॉल्वर ठेवलेल्या पिशवीला धक्का लागला.
पिशवी जमिनीवर पडली. त्यानंतर रिव्हॉल्वरचा चापावर दाब पडला आणि गोळीबार झाला. रिव्हॉल्वरमधून सुटलेली एक गोळी त्याच्या पायातून आरपार गेली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेतील सुरक्षा रक्षकाच्या मुलावर रुग्णालयात उपाचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.