Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी जहरी टीका केली आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSaam Tv
Published On

महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्या सारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.‌ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाच्या काळात पैसे गोळा केले आहेत. आरोग्य विभागात तर हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तानाजी सावंत खोटा माणूस आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अशा माणसाला विधानसभा निवडणुकीत जाग दाखवली जाईल. त्यांच्या मतदार संघात परिवर्तन अटळ आहे. आज अरण येथे संत सावता माळी भक्त निवासाचे लोकार्पण आमदार रोहित पवार व‌ खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत व राज्य सरकारवर सडकून टीका केली.

आरोग्य विभागात ६५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार सातत्याने करत आले आहेत. सुमित व बीव्हीजी या कंपनीलाआरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. त्यातून तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता.

Rohit Pawar
Ahilyanagar : अहमदनगर बनलं अहिल्यानगर, निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

निवडणुकीत फंड देण्यासाठी या कंपनीवर मेहरबानी दाखवली जात आहे. हा पैसा सामान्य जनतेचा असताना टेंडर डिझाईन करून वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमल्याकडे सर्व पुरावे असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. आरोग्य विभागात झालेल्या या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न असून राज्याला भिखारी केले आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आणि सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असंही म्हटलं होतं

दरम्यान अरण येथे संत सावता माळी भक्त निवासाचं रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळीही रोहित पवार यांनी तानाजी सावंत आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्या सारखा डल्ला मारणाऱ्या तानाजी सावंत यांच्या निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी जहरी टीका करत तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाच्या काळात पैसे गोळा केले आहेत. आरोग्य विभागात तर हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तानाजी सावंत खोटा माणूस असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विधासभा निवडणुकीला काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar
Cabinet Decisions : ७८००० तरुणांना मिळणार रोजगार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४१ निर्णयांना मंजुरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com