Ahilyanagar : अहमदनगर बनलं अहिल्यानगर, निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ahmednagar Become Ahilyanagar : अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी करण्याच्या प्रस्तवाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
Ahilyanagar
AhilyanagarSaam Digital
Published On

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी जिल्हा करण्याच्या मागणीला शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली असून अहमदनगर आता अहिल्यानगर या नावाने ओळखलं जाणार आहे. महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या या वर्षी पुण्यश्लोक अहिल्या देवींची 300वी जयंती आहे आणि हा निर्णय एक ऐतिहासिक घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमात घोषणा केली होती की अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवींच्या नावावर ठेवलं जाईल. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारांशी यावर चर्चा केली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील या नावबदलाच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. त्याआधी रेल्वे मंत्रालयाने राज्य आणि जिल्हा प्रशासनाला अहिल्यानगर या नावावर कोणतीही हरकत नसल्याचे कळवले होते. केंद्र सरकारने अहिल्यानगर नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

Ahilyanagar
Cabinet Decisions : ७८००० तरुणांना मिळणार रोजगार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४१ निर्णयांना मंजुरी

अहमनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

महिनाभरापू्र्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झालं होतं.आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यासंबंधीचे धडाधड निर्णय होत आहेत.

Ahilyanagar
kiren Rijiju : म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला; किरण रिजिजू यांचा धक्कादायक दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com