Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत संशयाचा धूर, वृद्ध जोडप्यासह नोकराच्या मृत्यचं कारण काय?

Andheri Building Fire Update: लोखंडवालामधील रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत वृद्ध जोडप्यासह त्यांच्या नोकराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत संशयाचा धूर, वृद्ध जोडप्यासह नोकराच्या मृत्यचं कारण काय?
Andheri FireSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्ती असलेल्या लोखंडवाला संकुलातील एका इमारतीला भीषण आग लागली होती. दहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून तिघांचा मृत्यू झाला होता. वयोवृद्ध जोडपं आणि त्यांच्या नोकराचा या आगीमध्ये मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

लोखंडवालामधील रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत वृद्ध जोडप्यासह त्यांच्या नोकराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. लोखंडवाला फोर्थ क्रॉस लेन येथे ही इमारत आहे. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप तपास सुरू आहे. या आगीबाबत संशय व्यक्त होत असून याप्रकरणी ओशिवरा पोलिस तपास करत आहेत.

रिया पॅलेस या १४ मजल्याच्या इमारतीच्या १० व्या मजल्यावर वृद्ध जोडपे आणि त्यांचा नोकर राहत होते. पण बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली आणि या आगीमध्ये होरपळून वृद्ध जोडप्यासह नोकरचा देखील मृत्यू झाला. मात्र ही आग विझवताना अग्निशमन दलाला या ठिकाणी काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. या संदर्भात अग्निशमनदालाकडून पोलिसांना देखील कळवण्यात आले आहे.

Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत संशयाचा धूर, वृद्ध जोडप्यासह नोकराच्या मृत्यचं कारण काय?
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज आणि उद्या ५ ते १० टक्के पाणीकपात, नेमकं कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात लागलेली ही आग विद्युत बिघाडामुळे लागल्याचे प्रथमदर्शनी कुठेही दिसून आले नाही शिवाय घरात टरपेंटाइनचा डबा आढळून आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे या आगीबाबत आता इमारतीतील रहिवाशांसोबतच पोलिसांकडून देखील संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत संशयाचा धूर, वृद्ध जोडप्यासह नोकराच्या मृत्यचं कारण काय?
Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसला भीषण अपघात, १५ प्रवासी गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com