Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Uddhav Thackeray Group: ठाकरे गटाच्या आमदारांनी काल झालेल्या बैठकीत एबी फॉर्म स्वीकारले नाहीत.अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मुळात त्या बैठकीत नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी साम टीव्हीकडे आहे...पाहूया..मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं.

मातोश्री म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक हेच चित्र डोळ्यासमोर येतं...निवडणुका असोत वा शिवसेनेचा मेळावा किंवा आंदोलन...मातोश्री बाहेर निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी ठरलेलीच.

अशीच गर्दी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मातोश्रीवर झाल्याचं पाहायला मिळालं... मातोश्रीच्या अंगणात मात्र चिंतेचं वातावरण होतं..विधानसभेला तिकीट मिळणार की नाही यासाठी नव्हे...तर आपल्या बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या काळजीनं...उद्धव ठाकरेंच्या काळजीनं... ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आजारानं गाठलं..त्यांच्यावर थेट अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे शिवसैनिकांच्या काळजाचं पाणी झालं होतं...ठाकरेंना दोनच दिवसांत डिस्चार्जही देण्यात आला. उद्धव ठाकरे विश्रांती घेत होते. त्यामुळे दारी आलेल्या निष्ठावंतांना आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केलं.

उपस्थित असलेल्या सर्वच आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यादी जाहीर होण्याची वाट पाहू नका. आवश्यक औपचारिकता पूर्ण झालीये.त्यामुळे तुम्ही फॉर्म घेऊन गेलात तरी चालेल’, असं आदित्य म्हणाले... उपस्थित निष्ठावंतांमध्ये शांतता पसरली.. सगळेचं एकमेकांकडे पाहू लागले..कोणी काहीच बोलत नव्हतं.. मात्र अखेर उपस्थित निष्ठावंतांनी एकजुटीनं नकार दिला आणि उद्धव ठाकरेंची तब्येत बरी झाल्यानंतर एबी फॉर्म घेऊ, साहेब आजारी असताना फॉर्म घेणं चुकीचं वाटतं, असं मत आमदारांनी व्यक्त केलं.. आमदारांच्या या शब्दांमुळे मातोश्रीचं वातवरण भावूक झालं...आदित्य ठाकरेही गहिवरले...निष्ठावंत आमदारांच्या या शब्दाला मान देत आदित्य ठाकरे यांनीही होकार दिला. यावेळी मातोश्रीवर सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, वैभव नाईक उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन आणि उद्धव ठाकरे ठणठणीत बरे होऊ दे आशीर्वादरुपी एबी फॉर्म घ्यायला येतो, म्हणत आमदार मातोश्री बाहेर पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com