Sujay Vikhe Patil: कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर गाडून टाकू, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा; विधानसभेसाठी शड्डू ठोकला!

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणं सुद्धा अवघड झाल आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहतं का? अशी परिस्थिती आहे.. असे सुजय विखे म्हणाले.
Sujay Vikhe Patil: कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर गाडून टाकू, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा; विधानसभेसाठी शड्डू ठोकला!
Sujay Vikhe Patil Balasaheb thorat Saam tv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर

'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहते का? अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांची 40 वर्षातली दहशत मोडून काढणार आहे,' असा निर्धार करत भारतीय जनता पक्षाचे नेते सुजय विखे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

"आजची सभा ही संगमनेर विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी आहे. चाळीस वर्षाची दहशत मोडून काढणारी आजची सभा आहे. चाळीस वर्षात तुम्हाला महिलेच्या डोक्यावरचा हंडा काढता येत नसेल तर तुम्हाला विधानसभेचा फॉर्म भरायचा सुद्धा अधिकार नाही. मला तिकीट नाकारलं हे मीडियात पाहिले, कोणत्या सूत्रांनी ही माहिती दिली? यांची हवा इतकी टाईट झाली का आता हे बातम्या सुद्धा पेरायला लागले. चाळीस वर्षे तुम्ही सेटलमेंटच राजकारण केले," अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली.

"आता असा गडी आलाय, की जो तुमचे ऐकणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणं सुद्धा अवघड झाल आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहतं का? अशी परिस्थिती आहे. लोकसभेला दुर्दैवाने माझा पराभव झाला. यांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना लय आनंद झाला. आरे हटा, माझा पराभव तुम्ही करू शकत नाही. लोकसभा निवडणूक धर्म आणि जातीच्या नावावर झाली म्हणून सुजय विखे पडला. विकास कामाच्या आधारावर निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कुणामध्ये दम नाही सुजय विखेला पाडायचा," असा घणाघातही सुजय विखे पाटील यांनी केला.

Sujay Vikhe Patil: कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर गाडून टाकू, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा; विधानसभेसाठी शड्डू ठोकला!
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

"संगमनेरमध्ये माझ्या कार्यकर्त्यांवर जर कोणी दहशत करायचा प्रयत्न केला, जर माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर इथेच येऊनच मी तुम्हाला गाडेल हा सुजय विखेचा शब्द आहे, असा इशाराही सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील पराभवानंतर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. सुजय विखे पाटील हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

Sujay Vikhe Patil: कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर गाडून टाकू, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा; विधानसभेसाठी शड्डू ठोकला!
Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com