Ajit Pawar vs Mahesh Landge, Pimpri Chinchwad municipal election 2025 political analysis Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

PCMC Election 2025 : जुना दादा की नवा दादा, गड कोण राखणार? पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत थेट लढत

Pimpri Chinchwad Municipal Elections 2025 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार आणि महेश लांडगे या दोन्ही दादांमध्ये गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहे. २०२५ मध्ये कोणाचा पिंपरी चिंचवडवर झेंडा फडकणार? महायुतीत अंतर्गत लढत होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे ( प्रतिनिधि)

Ajit Pawar vs Mahesh Landge, Pimpri Chinchwad municipal election 2025 political analysis: राज्याच्या राजकारणात स्पष्टवक्ता आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या अजितदादा पवार यांचा पिंपरी चिंचवड शहर हा गड समजला जातो. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात अजित पवारांची दूरदृष्टी आणि शहराच्या विकासात दिलेलं योगदान हे कधीच नाकारता येणार नाही. मात्र राज्यात 2014 मध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात अजितदादांच्या विकास कामाला आणि राजकारणाला टक्कर देणारा आणखी एक नवा दादा अजित दादांच्या बालेकिल्लात उदयास आला आहे.

अजित दादाला टक्कर देणारा दादा दुसरा कोणी नाही, तर कधीकाळी त्यांच्याच पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला, भोसरी विधानसभा क्षेत्रातून नगरसेवक आणि त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेला भोसरी विधानसभा क्षेत्राचा आमदार महेश लांडगे उर्फ महेश दादा.... अजित दादा यांच्य पाठोपाठ महेश दादा यांनी देखील पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकास काम मंजूर करून उभरत्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. (Ajit Pawar vs Mahesh Landge Maharashtra civic polls News Update)

पिंपरी चिंचवड शहरावर पूर्वी अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं प्रामुख्याने वर्चस्व होतं. मात्र लक्ष्मण जगताप यांच्या आकस्मिक निधनानंतर, पिंपरी चिंचवड शहरात शहरात महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेत आपली स्वतःची एक वेगळी राजकीय ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात जगताप कुटुंबियांचे वजन काहीसं कमी झाला आहे. मात्र जगताप कुटुंबीयांचा राजकारणातील दरारा कायम टिकवण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू तसेच विद्यमान आमदार शंकर जगताप हे देखील प्रयत्नशील आहेत. मात्र 2022 मध्ये तर पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता एक प्रकारे ही महेश दादा लांडगे यांच्या हातात केंद्रित झाली होती असं अशी देखील चर्चा पिंपरी चिंचवड शहरात करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित दादा आणि महेश दादा हे जरी महायुतीत एकत्र असले तरी पिंपरी चिंचवड शहरात अजित दादा आपला गड राखण्यात यशस्वी ठरतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असणार आहे.

महापालिकेची सत्तेतील गणित

पिंपरी चिंचवड शहरात एकूण तीन विधानसभा क्षेत्र असून, 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शहरात एकूण 32 प्रभाग होते त्या 32 प्रभागांमधून जवळपास 128 नगरसेवक निवडून आले होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत कोणत्या पक्षाचे नगरसेवकांचे बलाबल किती होतं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजूया..

2017 पक्षीय बलाबल, ( एकूण 32 प्रभाग, 128 नगरसेवक).

01) भाजपा - 77

02) राष्ट्रवादी - 36

03) शिवसेना - 9

04) अपक्ष - 5

05) मनसे - 1

यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापालिकेत भाजपला बहुमत मिळत भाजपची सत्ता आली होती.

पिंपरी चिंचवड शहरातील युती आणि आघाडीच राजकारण

पिंपरी चिंचवड शहरात सध्या तीन विधानसभा क्षेत्र असून या तिन्ही विधानसभा क्षेत्रावर महायुतीतील आमदार निवडून आले आहेत. या तीन विधानसभा क्षेत्रापैकी चिंचवड विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार शंकर जगताप तर भोसरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत, तर पिंपरी विधानसभा क्षेत्र या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या तिन्ही आमदारावर महापालिकेची सत्ता आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

महापालिकेतील सत्ता मिळविण्याची जबाबदारी

राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असते ते पक्ष प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून येण्याची दाट शक्यता असते. मात्र सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्याचबरोबर रामदास आठवले यांच्या आरपीआय गटाची सत्ता आहे. त्यामुळे हे चारही महायुतीतील प्रमुख पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढणार का ? लढले तर या तिन्ही पक्षात कशाप्रकारे जागांचा वाटप होईल ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील महायुतीच्या नेत्यांचं स्थानिक राजकारण पाहता, पिंपरी चिंचवड शहरात महायुती ही महापालिका निवडणूक एकत्र न लढता महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्याला कारणही तशीच आहेत. तर महाविकास आघाडीला शहराचे स्थानिक राजकारणात नेतृत्व करणारा एक मुखी पाठिंबा असलेला नेता अजून मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी देखील पिंपरी चिंचवड शहरात आघाडी करून स्थानिक स्वराज्य निवडणुकीला समोर जाईल अशी शक्यता आहे.

शरद पवार गटाचा निवडणुकीतील प्रभाव

पिंपरी चिंचवड शहर हा ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गड मानला जातो. पण याच भागात शरद पवार यांना देखील मानणारा मतदार मोठा आहे. तसेच त्यांच्या पक्षात तुषार कामटेसारखे युवा शहराध्यक्ष आणि राहुल कलाटे सारखा राजकारणातला अनुभवी चेहरा देखील आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाचे देखील काही नगरसेवक नक्कीच निवडून येतील असे चित्र आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव

पिंपरी चिंचवड शहर हा जरी अजित पवारांचा गड असला तरी या शहरातील भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडे महापालिकेतील राजकारणातील अनुभव असलेला सचिन भोसले सारखा चेहरा देखील आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उद्धव ठाकरे गट देखील निर्णायक भूमिकेत असणार आहे.

मनसे फॅक्टर चा प्रभाव

2017 च्या महापालिका निवडणुकीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सचिन चिखले हा एक मात्र नगरसेवक निवडून आला होता. मनसेचा शहरात प्रभाव कमी असला तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे बंधूंचा युतीचा काही करिष्मा पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षाकडून ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली ते इच्छुक उमेदवार देखील दोन्ही ठाकरे बंधूंकडे उमेदवारी मागण्याची दाट शक्यता आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांची जमेची बाजू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती अशी सध्या भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांची ओळख आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेची पुन्हा एकदा सत्ता खेचून आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेचा अधिकचा निधी फक्त भोसरी मतदार संघात वाढवण्यात आला असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याच मतदारसंघातील आणि त्यांचे निकटवर्ती असलेले नितीन लांडगे हे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाईचा देखील फटका महेश लांडगे किंवा भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT