Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv

Pune : पुण्यात खळबळ! शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा, कारण काय?

FIR filed against NCP MLA Bapu Pathare in Pune for assault : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापू पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बंडू खांदवे यांना मारहाण आणि चैन हिसकावल्याचा आरोप करण्यात आलाय. आमदार पठारे, मुलगे आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल.
Published on

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Sharad Pawar’s NCP MLA faces criminal charges after clash with Bandu Khandve : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रावादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये आमदार पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पठारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि गळ्यातील चैन चोरल्याचा उल्लेख एफआयएरमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापले आहे.

कुणाविरोधात झाला कुणादाखल?

काही दिवसांपूर्वी पठारे यांनी खांदवे यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. आता याप्रकरण आणखी तापले असून खांदवे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. आमदार पठारे यांच्या विरोधात बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पठारे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पठारे यांचा पुतण्या माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Sharad Pawar
Ladki Bahin Yojana : दिवाळी गोड! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार, आदिती तटकरेंची माहिती

नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

बंडू खांदवे यांना जबर मारहाण करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेण्याचा गुन्हा आमदार पठारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी लोहगाव मध्ये एका कार्यक्रमादरम्यान बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्यात वाद झाला होता. या वादात हाणामारी झाली होती. त्यानंतर पठारे यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून बंडू खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता बंडू खांदवे यांच्या तक्रारीवरून आमदार पठारे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार पठारे यांच्यासह त्यांची दोन मुले पुतण्या आणि एकूण नऊ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत

Sharad Pawar
Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com