Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

BMC Employee Found Dead in SRA Building : मुंबईतील कुर्ला वेस्टमधील एसआरए प्रकल्पात बीएमसी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला असून, आत्महत्या की हत्या यावर पोलिस चौकशी करत आहेत.
BMC Elections
BMC ElectionsSaam Tv
Published On

BMC employee found dead in Kurla SRA building 2025 : मुंबईतील कुर्लामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिममधील एचडीआयएल कंपाऊंडमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारण म्हणजेच एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत बीएमसी (बृहन्मुंबई महानगर पालिका) कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की, हत्या याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. या प्रकरणी व्हीबी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ कऱण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा शोध घेतला जातोय. (Kurla West SRA building police inquiry BMC staff)

गुरूवारी दुपारी कुर्ला पश्चिममधील एचडीआयएल कंपाऊंडमधील (HDIL Compound, Kurla West) एसआरएच्या इमारत क्रमांक ९ मध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा व्यक्ती बीएमसीमध्ये कार्यरत होता. सायंकाळी साडेचार वाजता या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती व्हीबी नगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली. पोलिसांकडू या प्रकऱणाची सकोल चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या सरकारी रूग्णालयात पोस्ट मार्टमसाठी पाठवलाय.

BMC Elections
Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

एसआरएच्या इमारतीत मृतदेह भेटल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ तपासास सुरूवात करण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षी मृत व्यक्तीचे नाव राजेश परमार असे आहे. राजेश परमार हा घाटकोपरमधील रहिवासी आहे. राजेश हा बीएमसी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (एसडब्ल्यूएम) विभागात एफ नॉर्थ वॉर्डमध्ये काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

BMC Elections
अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

राजेश याचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली आहे. आजूबाजूच्या ठिकाणी चौकशी केली जातेय. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जत आहे. एसडब्ल्यूएम विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा जाबाबही पोलिसांनी घेतला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. राजेश यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

BMC Elections
MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता मुलाखतीआधीच कागदपत्रांची पडताळणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com