MHADA Engineer : म्हाडाचा अभियंता जाळ्यात अडकला, लाच घेताना ACB ने रंगेहात पकडला

MHADA engineer caught taking bribe ACB Mumbai details : मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा अभियंता रणजीत चव्हाण याला ACB ने ४० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं. चार लाखांच्या मागणीनंतर तडजोडीने पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई झाली.
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

MHADA Engineer Caught Red-Handed Taking Bribe : म्हाडाच्या अभियंत्याला लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले. वांद्रे येथे ACB ने सापळा रचत म्हाडाच्या अभियंत्याला ४० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. रणजीत चव्हाण असे अभियंत्याचे नाव आहे. त्याने एका व्यक्तीकडे चार लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामधील पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले. हे नेमकं प्रकऱण काय आहे? अटक कुणी केली? याबाबत जाणून घेऊयात..

महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात यशस्वी सापळा रचत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रणजीत बाळासाहेब चव्हाण (वय 50) याला 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदार (वय 62 वर्षे) यांच्या रो-हाऊसवर अनधिकृत बांधकाम व पेइंग गेस्ट व्यवसायाबाबत कारवाईचा अहवाल पाठवण्याची धमकी देत, कारवाई न करण्यासाठी आरोपीने सुरुवातीला 4 लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 2 लाखांवर समझोता झाला होता. त्यातील पहिला हप्ता म्हणून आरोपीने 40 हजार रुपये स्वीकारताना ACBच्या पथकाने त्याला पकडले.

Bribe Case
Ladki Bahin Yojana : दिवाळी गोड! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार, आदिती तटकरेंची माहिती

ही कारवाई दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने केली. कारवाई पोलीस निरीक्षक गणपत परचाके यांच्या पर्यवेक्षणाखाली, तर सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मार्गदर्शन अपर पोलिस आयुक्त संदीप दिवाण, अपर उप पोलिस आयुक्त अनिल घेरडीकर आणि अपर उप पोलिस आयुक्त राजेंद्र सांगळे यांनी केले.

Bribe Case
Maharashtra Politics : योगेश कदमांना खिंडीत गाठलं, अनिल परबांनी नेमके काय केले आरोप?

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा क्रमांक 32/2025 नोंदविण्यात आला आहे. ACBने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडून लाचेची मागणी झाल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Bribe Case
Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com