Why did Anil Parab demand Yogesh Kadam’s resignation : कुख्यात गुंड सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम चांगलेच अडचणीत आलेत.. कारण अनिल परबांनी योगेश कदमांना खिंडीत गाठलंय... नेमके अनिल परबांनी काय आरोप केलेत आणि त्याला कदम पितापुत्रांनी काय उत्तर दिलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
ऐकलंत...ठाकरे सेनेचे नेते अनिल परबांनी सचिन घायवळच्या शस्त्रपरवाना प्रकऱणी आता थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केलीय... आणि त्याला कारण ठरलंय योगेश कदमांच्या सहीने कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला दिलेला शस्त्रपरवाना....आता कुख्यात गुंडाला शस्त्रपरवाना दिल्याप्रकरणी कदमांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत योगेश कदमांना घेरत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
अनिल परबांचे हेच आरोपांचे वार जिव्हारी लागल्यानं मुलगा योगेश कदमांच्या बचावासाठी रामदास कदमांनी धावाधाव केलीय.. संबंधित व्यक्तीवर गुन्हे नसल्यानेच शस्त्रपरवान्याचा निर्णय घेतल्याचं सांगत रामदास कदमांनी योगेश कदमांची पाठराखण केलीय... तर योगेश कदमांनीही तीच री ओढलीय.
पुण्यात भर रस्त्यात कोयता गँगकडून हत्या, गोळीबार दरोडा, लुटमार होतेय.. मुलींवर हल्ले होत आहेत.. त्यामुळे पुण्यात खाकीचा खुळखुळा झालाय.. मात्र या खाकीचा खुळखुळा करणाऱ्या कुख्यात गुंड आणि गँगस्टर लोकांना सरकारच शस्त्रपरवाना देत असेल तर हे सर्वसामान्यांचं दुर्दैव आहे.. मात्र घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन पेटलेला परब विरुद्ध कदम वाद आणखी टोकाला जाणार हे मात्र निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.