Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Check Latest 24K and 22K Gold Prices Today : सोन्याच्या किंमतीने आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,२३,००० वर पोहोचला आहे. २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली असून दिवाळीपूर्वी सोन्याची ही विक्रमी झेप गुंतवणूकदारांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On

Gold Rate Today : मागील काही वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारात आर्थिक मंदीचे सावट आल्याने गुंतवणूक दारांचा कल सोन्याकडे वाढलाय. वाढती महागाई अन् आर्थिक अस्थिरता असल्यास सोन्यामध्येच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. त्यामुळेच सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जातेय. पण दिवळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख २३ हजारांच्या पार गेले आहेत.

बाजारातील होणारी सोन्याची मागणी अन् पुरवठा यावरून किंमत वाढते अथवा घसरते. त्यामुळे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर किंमती माहिती असणं गरजेच आहे. भारतामध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२३३२ रूपये इतकी आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ११, ३०५ तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९२५३ रूपये इतकी आहे. दरम्यान, आज चांदीची किंमत प्रति ग्राम १५७ रूपये इतकी आहे तर प्रतिकिलो चांदीची किंमत १५७००० रूपये इतकी असेल. Today gold price in India per gram

Gold Rate Today
Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

२४ कॅरेट सोन्याची किंमत किती? (24k Gold Price in India Today)

1 ग्रॅम: 12,332 रुपये

8 ग्रॅम: 98,656 रुपये

10 ग्रॅम: 1,23,320 रुपये

100 ग्रॅम: 12,33,200 रुपये

भारतात आज २२ कॅरेट सोन्याची किंमत किती? (22k Gold Price in India Today)

1 ग्रॅम: 11,305 रुपये

8 ग्रॅम: 90,440 रुपये

10 ग्रॅम: 1,13,050 रुपये

100 ग्रॅम: 11,30,500 रुपये

१८ कॅरेट सोन्याची भारतात आज किंमत किती आहे? (18k Gold Price in India Today)

1 ग्रॅम: 9,253 रुपये

8 ग्रॅम: 74,024 रुपये

10 ग्रॅम: 92,530 रुपये

100 ग्रॅम : 9,25,300 रुपये

Gold Rate Today
Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

सोन्याने आज सर्वकालीन उच्चांकाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. प्रति तोळा १ लाख २३ हजारांकडे सोन्याची किंमत गेली आहे. हा आजवरचा सर्वाधिक दर ठरलाय. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वकालीन उच्चांकाचे नवनवे विक्रम प्रस्थापीत होत आहेत. त्यातच आज बुधवारीही सोन्याने नवा विक्रम केलाय.

Gold Rate Today
Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com