Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

Gold Price Today : जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर ₹१,२४,१०० आणि चांदीचा दर ₹१,५४,५०० वर पोहोचला आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Gold Prices in Jalgaon Latest News : जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख २४ हजार १०० रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ५४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

गेल्या ४८ तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रूपयांनी तर आणि चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर सव्वा लाख रूपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून तर चांदीच्या दराने 1 लाख 54 हजारांचा टप्पा पार केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोने आणि चांदीचे दर हे एक सारख्याच पद्धतीने सलग वाढत असल्याचा देखील चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.

Gold Price Today
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

सोन्याच्या दारात आणखी मोठी वाढ होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. सोन्याने चांदीच्या वाढलेल्या दरामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. फ्रान्सच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी, याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यात वाढलेली गुंतवणूक ही सोन्याने चांदीच्या दरवाढी मागचे प्रमुख कारण असल्याचा सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे.

Gold Price Today
Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरता नसल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मागील वर्षभरात सोन्याच्या दरात ४० ते ५० हजार रुपयांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याची किंमत आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत शटडाऊन, टॅरिफचा फटका जागतिक बाजाराला बसला आहे. त्याशिवाय युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळेही सोन्याचे दर वाढले आहे.

Gold Price Today
दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com