दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

Bhandara electric shock incident mother and son : करंटचा तडाखा बसून मायलेकाचा आणि गाईच्या वासराचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे विद्युत तार तुटून शेतातील सोलार तारेवर पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. महानंदा आणि सुशील इलमकर यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara electric shock incident mother and son : भंडाऱ्यातील साकोली तालुक्यातील मालूटोला येथे करंटचा तडाखा बसून मायलेकाचा आणि जनावराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महानंदा प्रभुदास इलमकर (५०), सुशील प्रभुदास इलमकर (३०) असं मृत मयलेकाचं नावं आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सोलारवर आधारित हलका विद्युत प्रवाह असलेली तार शेत-शिवाराभोवती लावलेली होती. मात्र, रविवारी दुपारी वादळ-वाऱ्यासह आलेल्या पावसात मेन विद्युतवाहक तार तुटून या सोलारवर पडली. याची कल्पना नसताना त्यांना याचा जबर प्रवाह बदल्यान ही घटना घडली.

भंडारा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान एक विद्युत तार वादळी वाऱ्यामुळे तुटून गायीच्या गोठ्यावर पडली. यात गोठ्यातील वासराचा दुर्दैवी अंत झाला. या वासराला काय झाले हे पाहण्यासाठी जवळच उभी असलेली एक महिला तेथे गेली. नकळत या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिचाही जागीच मृत्यू झाला. आईला काय झाले म्हणून जवळच उभा असलेला लेक धावला. मात्र त्याचाही स्पर्श विद्युत तारेला झाला आणि करूण अंत झाला. मायलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साकोली तालुक्यातील मालूटोला येथील महानंदा प्रभुदास इलमकर व सुशील प्रभुदास ईलमकर हे दोघे मायलेकांचा शेतामध्ये विद्युत तारांच्या स्पर्शाने तीव्र धक्क्याने या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Electric Shock
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

मालूटोला येथील येथे दुपारच्या वेळात वादळ वारा आल्याने लाकडाच्या बल्लीवर लावलेली विद्युत तार तुटली. या जिवंत तारेवर गाईचे वासरू गेल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल. वासराला काय झाले पाहण्यासाठी महानंदा ईलमकर (५०) गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का लागून त्यांचाही मृत्यू झाला. आईला पाहण्यासाठी दिलेले सुशील ईलमकर वय ३० याला देखील जिवंत तारांचा स्पर्श होऊन विद्युत धक्क्याने त्याचाही मृत्यू झाला.

Electric Shock
Mumbai : शिवसेना नेत्याच्या मुलाचं काळं कृत्य, सार्वजनिक शौचालयात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मुंबई हादरली

दुपारी दोन वाजता शेतात गेलेले मायलेक घरी परत न आल्यामुळे पती प्रभुदास ईलमकर हे सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना पत्नी आणि मुलगा तसेच जवळच एक वासरू मेलेल्या अवस्थेत दिसले मन हे लावून टाकणारे हे दृश्य बघून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी लगेच गावात येऊन ही घटना सांगितली गावकऱ्यांनी शेतात पाहिले असता मायलेकाचा व वासराचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली. तेव्हा पोलीस पाटील टेंभरे यांनी साकोली पोलिसांना या घटनेची माहिती रात्री आठ वाजता दिली आहे.

Electric Shock
पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com