Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

Massive fire after LPG blast on Jaipur Ajmer highway : जयपूर-अजमेर हायवेवर मंगळवारी रात्री एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकला केमिकल टँकरची धडक बसली. भीषण स्फोटांनी परिसर हादरला. दोन तासांत तब्बल २०० सिलिंडरचे स्फोट झाले.
LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :
LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :Saam TV Marathi News
Published On

LPG truck and chemical tanker accident in Rajasthan : जयपूर-अजमेर हायवेवर मंगळवारी रात्री एक भयानक अपघाताची घटना घडली. रात्री ११ वाजता एलपीजी सिलिंडेरने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की जिकडे तिकडे एकच खळबळ उडाली होती. केमिकलने भरलेल्या ट्रकने एलपीजी सिलिंडरच्या वाहनाला जोरात धडक दिली. त्यामुळे धडाधड स्फोट होण्यास सुरूवात झाली. एकामागोमाग एक सिलिंडरचे स्फोट होत होते. दोन तासात तब्बल २०० गॅस सिलिंडरचे स्फोट झाली. दिवाळीमध्ये अॅटमबॉम्ब जसे धडधड उडतात, तसे एलपीजी सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट होत होता. ही भयानक घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

मंगळवारी रात्री जयपूर-अजमेर महामार्गावर दूदू परिसरात सावरदा पुलाजवळ हा भयानक अपघात झाला. LPG सिलिंडरांनी भरलेल्या ट्रकला रासायनिक पदार्थांनी भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. त्यामुळे आग लागली आणि सिलिंडर फुटून स्फोट होऊ लागले. या घटनेने परिसरात दहशत पसरली, आणि महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एकापाठोपाठ एक २० सिलिंडरचा स्फोट झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. तीन ते चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

हायवेवर नेमकं काय घडले?

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मौजमाबाद तालुक्यातील सावरदा गावाजवळ एक ट्रक धाब्याच्या बाहेर थांबलेला होता. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या टँकरने ट्रकला मागून धडक दिली. धडकेमुळे ट्रक पलटला आणि त्यातील सिलिंडरांना आग लागली. काही क्षणांतच सिलेंडर एकामागोमाग फुटू लागले. स्फोटांचा आवाज १० किलोमीटरपर्यंत ऐकू गेला आणि आगीच्या ज्वाळांनी आकाश उजळले. धुराचे लोट दूरवर दिसत होते. या भयानक परिस्थितीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

घटनेची माहिती मिळताच दूदू, बगरू आणि किशनगड येथील अग्निशामन दल, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण सतत होणाऱ्या स्फोटांमुळे हे काम कठीण झाले. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बंद करून परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रशासनाला तात्काळ मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.

LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :
Navi Mumbai Airport : नवी मुंबई, नवं उड्डाण! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विमानतळाचे लोकार्पण

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले ?

आम्ही धाब्यावर जेवत होतो, तेव्हा अचानक मोठा आवाज झाला. आम्ही बाहेर पाहिले तर आग आणि धूर दिसला. सिलिंडर हवेत उडत होते आणि स्फोट होत होते. आम्ही जीव वाचवण्यासाठी पळालो, असे घटनास्थळावर उपस्थित असणाऱ्या रमेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, काही स्थानिकांनी धाडस करून ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. कदाचीत ते आधीच बाहेर पडले असतील, असे म्हटले जातेय.

LPG truck and chemical tanker accident in Rajasthan :
Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com