Navi Mumbai Airport : नवी मुंबई, नवं उड्डाण! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विमानतळाचे लोकार्पण

PM Modi Navi Mumbai Airport News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. 19,650 कोटी खर्चून उभारलेला हा देशातील पहिला हरित विमानतळ असून दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांची क्षमता असेल.
Navi Mumbai International Airport
PM Modi to inaugurate Navi Mumbai International Airport on October 8, flights to start from December.saam tv
Published On

Prime Minister Narendra Modi will inaugurate the Navi Mumbai International Airport today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं जाणारेय. प्रशासनाच्या दृष्टीनं उद्घाटनाची संपूर्ण तयारी करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणारेय. (PM Modi inaugurates Navi Mumbai International Airport details :)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन (When will Navi Mumbai Airport open?) करतील. तसेच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

Navi Mumbai International Airport
Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

पंतप्रधान नवी मुंबईत पंतप्रधान मोदी, देशाला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या संकल्पानुरूप सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा हरित क्षेत्र विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीअंतर्गत तो विकसित करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर कार्यरत राहील. यामुळे गर्दी कमी होण्‍यास मदत मिळेल, तसेच मुंबईला जागतिक बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत आणता येईल. या विमानतळाचे क्षेत्रफळ 1160 हेक्टर असून जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरण्याच्या दृष्टीने त्याचे आरेखन करण्यात आले आहे. परिणामतः हे विमानतळ दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी (एमपीपीए) आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल.

Navi Mumbai International Airport
Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमध्ये स्वयंचलित प्रवासी वहन (एपीएम) या परिवहन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे सर्व चारही प्रवासी टर्मिनल सुरळीतरीत्या आंतर-टर्मिनल स्थानांतरणासाठी जोडली जातील तसेच विमानतळाहून शहरांकडील पायाभूत सुविधांसाठी जोडणी उपलब्ध होईल. शाश्वततेसाठी विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक सुविधा, अंदाजे 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि संपूर्ण शहरात सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ईव्ही बस सेवा असतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा वॉटर टॅक्सीने अर्थात जलमार्गाने जोडलेला देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.

Navi Mumbai International Airport
Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com