मुंबई किंवा नवी मुंबईसारख्या ठिकाणी स्वतः चे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. सध्या मुंबई किंवा नवी मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिले नाही. त्यामुळेच लोक म्हाडा किंवा सिडकोच्या लॉटरीत घर घेतात. घरांच्या किंमती कोट्यवधी रुपये झाल्या आहेत.
स्वतः चे घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिडकोकडून लवकरच नवीन घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून लॉटरी काढली जाणार आहे. नवी मुंबईतील तब्बल २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही घरे विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या सिडकोच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. मागील गृहयोजनेतील १६ हजार घरांचाही यात समावेश केला जाणार आहे. सिडकोने मागच्या वेळी जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
कोणत्या भागातील घरांसाठी निघणार लॉटरी (CIDCO Lottery)
सिडकोच्या या लॉटरीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात होईल. सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक आहे. यानंतर ही घोषणा केली जाऊ शकते. या नवीन लॉटरीतील घरे वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणगिरी या भागात असणार आहेत.
म्हाडाचीही लॉटरी लवकरच (Mhada Lottery)
मुंबईत म्हाडाकडूनदेखील दिवाळीपूर्वी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. ५००० घरांसाठी ही सोडत निघणार आहे. म्हाडाने पुढच्या वर्षी १९,४९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईत ५१९९ घरे बांधली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचे गर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको आणि म्हाडा दोन्हींकडून लॉटरी निघणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.