Actor wins Mhada Lottery
Actor wins Mhada LotterySaam Tv

Actor wins Mhada Lottery: 'एका Artist चं घर...'; या अभिनेत्याला लागली म्हाडा लॉटरी; फॅमिलीसोबत थाटाट केला गृहप्रवेश

Marathi Actor wins Mhada Lottery: 'चार दिवस सासूचे' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेले मराठी अभिनेते श्रीकांत देसाई यांना म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळाले आहे.
Published on

Marathi Actor wins Mhada Lottery: 'चार दिवस सासूचे' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेले मराठी अभिनेते श्रीकांत देसाई यांना म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळाले आहे. त्यांनी पत्नी रुपाली आणि मुलगी दिशा यांच्यासह नव्या घरात गृहप्रवेश केला. या आनंदाच्या क्षणी दिशाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेते श्रीकांत देसाई यांची मुलगी दिशा देसाई ही प्रसिद्ध कथक नृत्यांगना असून, तिने आपल्या पोस्टमध्ये आई-वडिलांच्या कलेवरील निष्ठेचे कौतुक केले आहे. ती म्हणते, "एक सच्चा कलाकार कधीच थांबत नाही. कितीही अडचणी आल्या तरीही कलाकार आपल्या कलेमुळे जिवंत राहतो." तिने बाबा ICU मधील प्रसंगाची आठवण सांगत, आईने त्या काळातही आपले कलाकर्म थांबवले नाही, हे नमूद केले.

Actor wins Mhada Lottery
Sonali Bendre: सलमान खानला पसंत करणं कठीण; सोनाली बेंद्रेने अनेक वर्षांनंतर केली अभिनेत्याची पोलखोल

दिशाने पुढे लिहिले की, "माझ्या स्वप्नांना मोठं करण्यासाठी मी जितकी मेहनत घेते, तितकीच मेहनत माझे आई-वडीलही घेत आहेत." तिने आपल्या कुटुंबातील कलात्मक वातावरणाबद्दल अभिमान व्यक्त केला आणि एक कलाकार कुटुंबात जन्मल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Actor wins Mhada Lottery
Shweta Tiwari: ४४ वर्षीय श्वेता तिवारीच्या ट्रांसफॉर्मेशन सिक्रेट काय? 'फॅट टू फिट' होण्यासाठी वापरली 'ही' सोपी ट्रीक

मुंबईसारख्या महागड्या शहरात घर मिळवणे हे सामान्यांसाठीच नव्हे तर कलाकारांसाठीही एक मोठे स्वप्न असते. श्रीकांत देसाई यांच्या कुटुंबाला म्हाडाच्या लॉटरीतून मिळालेले हे घर त्यांच्या कलेवरील निष्ठेचे आणि मेहनतीचे फळ आहे. दिशाच्या पोस्टने अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या या यशाचा सन्मान केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com