Navi Mumbai CIDCO : सिडको ६७,२३५ घरांची लॉटरी कढणार, नवी मुंबईमध्ये हक्काचे निवारा मिळणार, किंमत किती?

Navi Mumbai CIDCO News : नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोची ६७ हजार घरं जवळपास तयार झाली आहेत. काही दिवसांत टप्प्या टप्प्याने लॉटरी निघणार आहे.
Navi Mumbai CIDCO : सिडको ६७,२३५ घरांची लॉटरी कढणार, नवी मुंबईमध्ये हक्काचे निवारा मिळणार, किंमत किती?
CIDCO Saam Tv
Published On

Navi Mumbai CIDCO : नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी सिडको (CIDCO) ६७,२३५ घरांची लॉटरी काढणार आहे. सिडकोमुळे अनेक मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना हक्काचे घर मिळण्याची संधी आहे. या घरांमध्ये ६० टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) राखीव आहेत, तर उर्वरित घरे LIG (Lower Income Group) कॅटेगरीसाठी असतील. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकाजवळ तब्बल ६७ हजार घरं तयार होण्याच्या मार्गावर आहेत. सिडकोकडून टप्प्या टप्प्याने घराची लॉटरी निघणार आहे. परवडणाऱ्या दरात सिडकोकडून घरांची विक्री करण्यात येणार असल्याचे समजतेय.

२०२० मध्ये सुरू झालेल्या प्रोजेक्टचे काम ६५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती सिडको प्रमुख विजय सिंघल यांनी प्रसारमाध्यमांना दिली. २०२५ च्या अखेरपर्यंत १५ हजार फ्लॅट्स तयार होण्याची शक्यता आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत सिडकोचा प्रोजेक्ट तयार होईल. १५ हजार कोटी रूपयांच्या या प्रोजेक्टमध्ये ६० टक्के घरे ही EWS कॅटेगरीसाठी आरक्षित आहेत, असेही सिंघल यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये तयार होणारी घरे ही प्रधानमंत्री आवस योजना (PMAY) अंतर्गत तयार होत आहे. आर्थिकदृष्टी कमकुवत असणाऱ्यांना हक्काचे घर मिळणार आहे.

Navi Mumbai CIDCO : सिडको ६७,२३५ घरांची लॉटरी कढणार, नवी मुंबईमध्ये हक्काचे निवारा मिळणार, किंमत किती?
Navi mumbai Cidco : २५ लाखांत घर, सिडको धमाका उडवणार, ६७२३५ घरं तयार, लॉटरी कधी निघणार?

सिडकोकडून वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, खारकोपर, तळोजा, कळंबोली, पनवेलसह इतर भागात घरे तयार केली आहेत. नवी मुंबईमध्ये ६०० एकरमध्ये ३५० इमारती असतील. ९ ते २४ मजली इमारती सिडकोकडून तयार करण्यात आली आहे. प्रत्येक फ्लोअरवर आठ फ्लॅट्स असतील, असे सिडकोच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Navi Mumbai CIDCO : सिडको ६७,२३५ घरांची लॉटरी कढणार, नवी मुंबईमध्ये हक्काचे निवारा मिळणार, किंमत किती?
Nashik MHADA: आता हक्काचं घर होणार, म्हाडा सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणार; नाशिकमध्ये तब्बल 'इतक्या' घरांची लॉटरी

EWS साठी 5,160 अपार्टमेंट्स

बामणडोंगरी रेल्वे स्टेशनजवळील सिडकोच्या टाउनशिपमध्ये EWS साठी 5,160 अपार्टमेंट्स आहेत. ३२२ स्क्वेअरफूटच्या 1BHK फ्लॅटची किंमत ३० लाख रूपये इतकी आहे. इमारतीमध्ये पार्किंग, मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डनसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. CIDCO प्रमुख विजय सिंघल यांनी सांगितले की, २५७२३ घरांसाठी नुकतीच लॉटरी काढली होती. त्यामधील १९५०० लोकांना घरं मिळाली आहेत. दीड लाख लोकांनी या लॉटरीमध्ये सहभाग नोंदवला होता.

घराची किंमत किती असेल? -

सिडकोन दिलेल्या माहितीनुसार, ६७ हजार घरांपैकी ६० टक्के घरे हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत. इतर घरं हे LIG साठी असतील. लोकेशननुसार, घरांच्या किंमती २५ लाख रूपये ते ९७ लाख (खारघर स्टेशन, सेक्टर-1) रूपयांपर्यंत असतील. ६ लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी सर्वाधिक घरे तयार करण्यात आली आहेत.

कुठे कुठे तयार होत आहेत घरं?

EWS : वाशी ट्रक टर्मिनस, खारघर बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, ताळोजा सेक्टर 37, नवाडे प्लॉट 2, पनवेल बस टर्मिनल

LIG : जुईनगर रेल्वे स्टेशन, खारघर रेल्वे स्टेशन, बामनडोंगरी रेल्वे स्टेशन, खारकोपर वेस्ट रेल्वे स्टेशन, ताळोजा सेक्टर 28, 31, 39, नवाडे प्लॉट 1, कळंबोली बस डिपो

EWS आणि LIG दोन्हीसाठी : खारकोपर ईस्ट रेल्वे स्टेशन, ताळोजा सेक्टर-29

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com