Nashik MHADA: आता हक्काचं घर होणार, म्हाडा सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणार; नाशिकमध्ये तब्बल 'इतक्या' घरांची लॉटरी

Nashik MHADA lottery 2025: नाशिक म्हाडा मंडळातर्फे ५०२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २० मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. फक्त १३ लाखांत नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Mhada
MhadaSaam Tv
Published On

नाशिकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमध्ये आता स्वत:च्या मालकिचे घर घेता येणार आहे. नाशिक म्हाडा मंडळातर्फे ५०२ सदनिकांची लॉटरी निघणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२५ असून, ऑनलाईन तसेच ऑफलाईन अनामत रक्कम २१ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे आता १३ लाखांत नाशिककरांना स्वत:चं घर घेता येणार आहे.

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मखलाबाद शिवार, पाथर्डी शिवार, सातपूर शिवार, हिरावाडी, विहितगाव शिवार, तपोवन द्वारका, म्हसरूळ शिवार, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, देवळाली, नांदूर दसक आणि मौजे दसक येथे विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आल्या आहेत. याअंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकासाठी एकूण ५०२ सदनिकांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे.

Mhada
Sambhajinagar: कुटुंबासोबत जेवण केलं, घरी जाऊन आयुष्य संपवलं; २५ वर्षीय तरूणीनं घेतला टोकाचा निर्णय

ऑनलाईन अर्ज नोंदणीला ७ फेब्रुवारीला २०२५ ला सुरूवात झाली होती. सुधारित वेळापत्रकानुसार, २० मार्च २०२५ पर्यंत अर्जदारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तर, ऑनलाईन तसेच ऑफलाईन अनामत रक्कम २१ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार आहे. अशी माहिती नाशिक म्हाडाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिले आहेत.

Mhada
Beed: बॉयफ्रेंडसोबत मुलीला पाहिलं, बापाच्या डोक्यात तिडिक गेली, पोराला काळा निळा होईपर्यंत मारलं, पोलिसांची धडक कारवाई

तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ९ एप्रिल २०२५ रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. मुख्य अधिकारी आवळकंठे म्हणतात, नाशिक मंडळाची ही सोडत २ घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण ३०० सदनिकांचा समावेश असून, अर्ज नोंदणीसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com