Vashi-Mankhurd: सायन - पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडीतून सुटका, वाशी ते मानखुर्द प्रवास होणार सुपरफास्ट

New Vashi-Mankhurd flyover: वाशी ते मानखुर्ददरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन नव्या उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
Vashi-Mankhurd flyover
Vashi-Mankhurd flyoverSaam
Published On

वाशी ते मानखुर्द प्रवास आता सुसाट होणार आहे. कारण वाशीखाडी पुलावर उभारण्यात आलेल्या २ नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, या दुसऱ्या पुलाचे उद्घाटन आज ५ जून रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या नव्या उड्डाणपुलामुळे सायन - पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटनानंतर काही दिवसांत हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

वाशी खाडी पूल परिसरात वाढती वाहतूक ही मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाशी खाडीत दोन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.

Vashi-Mankhurd flyover
Crime News: प्रायव्हेट पार्ट अन् शरीरावर स्क्रू ड्रायव्हरने वार, बॉयफ्रेंडनं शेतात बोलावून गर्लफ्रेंडला संपवलं

या प्रकल्पातील पहिला पूल, मानखुर्दहून वाशीकडे जाणारा मार्ग ऑक्टोबर महिन्यातच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता दुसऱ्या दिशेचा, वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा पूल तयार झाला असून, त्याचे आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

नागरिकांना दिलासा

दुसऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडीतून सामान्यांना दिलासा मिळणार आहे. दररोज वाशी ते मानखुर्द दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांचे वेळेची बचत तसेच इंधनाची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने ही सुविधा सकारात्मक ठरणार आहे. पुलाचे उद्घाटन होताच नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Vashi-Mankhurd flyover
Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या दोन्ही फोनमधून महत्त्वाचे पुरावे समोर, चॅटिंग अन् आर्थिक व्यवहाराची माहिती उघड

नागपूर ते मुंबई आता पूर्णपणे विनाअडथळा

नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवास आता पूर्णपणे विनाअडथळा आणि सुसाट होणार आहे. आज, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.

या टप्प्यातील इगतपुरी ते आमनेदरम्यानचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्ग आता प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com