
मुंबई- नवी मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ही घरे घेण्याचा विचारदेखील करु शकत नाही. दरम्यान, सिडको आणि म्हाडाच्या योजनेअंतर्गत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध आहेत. दरम्यान, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलावली आहे.
सिडको ने 26 हजार घरांची लॉटरी (CIDCO Lottery) काढली आहे. मात्र सिडकोच्या घरांच्या किमती भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सिडकोच्या घरांच्या लॉटरीकडे पाठ फिरवली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
सिडकोच्या घरांच्या किंमतीबाबत मनसे अनेक दिवसांपासून आक्रमक होती. सिडकोच्या घराच्या किमती कमी व्हाव्या यासाठी आंदोलन करत आहे. सिडकोच्या घराच्या किमती कमी होण्यासाठी आता सह्याद्री येथे आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अधिकारी तसेच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आणि सिडको सोडत धारक यांचे शिष्टमंडळ असणार आहेत.
सिडकोचे शिष्टमंडळ आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सिडको धारकांना काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच जर घरांच्या किंमती कमी केल्या तर सिडकोच्या लॉटरीसाठी नागरिक चांगला प्रतिसाद देणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी मुंबईत अनेकजण सिडकोच्या घरांसाठी अर्ज करतात. सिडकोचे घर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असते. परंतु सिडकोच्याही घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे लॉटरी निघाल्यानंतरही नागरिकांनी जास्त प्रमाणात प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.