Yashashri Shinde Case Saam Tv
मुंबई/पुणे

Yashashri Shinde Case: २०१९ चा राग, तुरुंगातून बाहेर येताच काढला काटा?, यशश्री शिंदेसोबत आरोपीने नेमकं काय केलं?

Priya More

नवी मुंबईच्या उरणमध्ये यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली होती. यशश्रीची हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या चेहऱ्यावर शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा आढळून आल्या. आरोपीने यशश्रीसोबत असं गंभीर कृत्य का केले असावे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी उरणकरांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. पण पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितले नाही.

यशश्री शिंदे ही २२ वर्षांची तरुणी उरणमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. यशश्रीने कॉमर्समध्ये शिक्षण घेतले होते. ती बेलापूरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. २५ जुलै रोजी ती ऑफिससाठी घरातून बाहेर पडली. पण दुपारपासून तिचा फोन बंद लागत होता. त्यामुळे तिच्या कुटंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. त्यानंतर तिच्या वडिलांनी उरण पोलिस ठाण्यात धाव घेत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तिचा शोध घेत असताना उरण येथील पेट्रोल पंपामागील झाडाझुडपात पोलिसांना तिचा मृतदेह सापडला.

यशश्रीची हत्या दाऊद शेखनेच केली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर त्याला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यशश्रीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, यशश्रीवर बलात्कार करण्यात आला नव्हता. चाकूने वार करत तिची हत्या करण्यात आली होती. आरोपीने तिच्या पोटावर, पाठीवर, छातीवर चाकूने वार केले होते.

यशश्रीची त्या दाऊद शेखने केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. हा दाऊद शेख मूळचा कर्नाटकचा आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊदने २०१८ मध्ये १४ वर्षीय यशश्री शिंदेला पाहिले आणि तो तिच्या मागेच लागला. तो नेहमीच तिचा पाठलाग करायचा. त्याने यशश्रीला आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्याने २०१९ यशश्रीचे शारीरिक शोषण केले होते. याप्रकरणी यशश्रीच्या कुटुंबीयांनी दाऊदविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दाऊदला तुरुंगात पाठवले होते.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा दाऊदने यशश्रीशी संपर्क साधून तिचा पाठलाग सुरू केला. दाऊदने गुरुवारी यशश्रीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याने तिची निर्घृण हत्या केली. यावर दाऊदचे समाधान झाले नाही. त्याने यशश्रीचा प्रायव्हेट पार्ट दगडाने ठेचला आणि तिच्या छातीवर वार केले. यशश्रीच्या डोक्यावरील केसही कापलेले आढळून आले आहे. २०१८ च्या प्रकरणाचा बदला म्हणूनच दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT