Uran Railway Station Video: पहिल्याच पावसात उरण रेल्वे स्थानक पाण्याखाली; अंडर ग्राउंडमध्ये पाणीच पाणी;VIDEO पाहाच

Uran Railway Station: पहिल्याच पावसात उरण रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. अंडर ग्राउंडमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उरण रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Uran Railway Station Video
Uran Railway Station VideoSaam Tv

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. नवी मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.या पावसाचा फटका उरण रेल्वे स्थानकाला बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्याचे उरण रेल्वे स्थानकात पाणी घुसले आहे.

उरण रेल्वे स्थानकात पाणी घुसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना त्रास होत आहे. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. पहिल्याचा पावसात उरण रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

उरण रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याने तुंबले आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळेच उरण रेल्वे स्थानक पाण्याने भरले आहे. उरण रेल्वे स्थानकातील अंतर्गत मार्ग आहे त्याठिकाणी पाणी भरले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पाणी जागीच तुंबले आहे.

प्रशासनाला यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, या उपाययोजना आधी न केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यानंतर आता परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मोटर लावण्याचे आणि पाण्याचा निचरा करण्याचे उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uran Railway Station Video
Viral Video: क्षुल्लक कारणांवरुन भररस्त्यात दोन महिलांमध्ये दे दणादण; VIDEO तुफान व्हायरल

सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे हळूहळू पाणी साचले होते. याचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतूकीवर झालेला नाही. रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी वापरला जाणाऱ्या भुयारी मार्गात हे पाणी साचले आहे.मोटारीच्या साहाय्याने रेल्वे स्थानकातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओत स्टेशनवरील भुयारी मार्गात पाणी साचले आहे.या सांडपाण्यातून प्रवाशी मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षादेखील उरण रेल्वे स्थानकाची अशीच अवस्था होती. मार्च २०२४ मध्ये नेरूळ आणि उरण या नवीन रेल्वे लाईनचे उद्घाटन झाले होते. पहिल्याच पावसात रेल्वे स्थानकात अंडर ग्राउंड पाणी साचले आहे.

Uran Railway Station Video
Maharashtra Milk Price Issue: दूधदरासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, नगर जिल्ह्यात रास्ता राेकाे आंदाेलनास प्रारंभ (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com