खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर अखेर लोकल धावणार आहे. या मार्गावर दररोज लोकलच्या ४० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. लोकल सेवेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
उरण-खारकोपर रेल्वे मार्गावरील लोकल काल, शुक्रवारी प्रवाशांच्या सेवेत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या मार्गावरील लोकलसेवेचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी या लोकलला हिरवा झेंडा दाखवला आणि बहुप्रतीक्षीत लोकल या मार्गावर धावली.
PM मोदी यांनी लोकलसेवेचे लोकार्पण केल्यानंतर या मार्गावर प्रवाशांसाठी लोकलसेवा (Local Train) उपलब्ध झाली आहे. या बहुप्रतीक्षीत नव्या मार्गावर लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मार्गावर अप आणि डाउन अशा दररोज ४० लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
उरण येथून बेलापूर आणि नेरूळ अशी अर्ध्या तासाला लोकल धावणार आहे. तर बेलापूर आणि नेरूळ येथून एका तासानं लोकल उरणकरिता सुटणार आहे. सकाळ आणि संध्याकाळी या मार्गावर गर्दी असते. या कालावधीत दहा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
उरण येथून बेलापूर आणि नेरूळ अशी अर्ध्या तासाला लोकल धावणार आहे. तर बेलापूर आणि नेरूळ येथून एका तासानं लोकल उरणकरिता सुटणार आहे. सकाळ आणि संध्याकाळी या मार्गावर गर्दी असते. या कालावधीत दहा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
उरण-नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील पहिला टप्पा खारकोपरपर्यंत असून तो ५ वर्षांपासून कार्यान्वित आहे. तर दुसरा टप्पा हा खारकोपर उरण असा असून, तो १४.६० किलोमीटरचा आहे. शुक्रवारपासून हा मार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे.
नेरूळ - खारकोपर-उरण-नेरूळ - एकूण २० लोकल धावतील. त्यातील अप मार्गावर १० आणि डाउन मार्गावर १० धावतील. बेलापूर सीबीडी-खारकोपर आणि उरण-बेलापूर सीबीडी अशा २० फेऱ्या असतील. अप आणि डाउन मार्गावर प्रत्येकी १० धावतील. उरण ते बेलापूर-नेरूळ मार्गावर गर्दीच्या वेळी अर्ध्या तासानं ट्रेन धावतील. तर गर्दी नसलेल्या वेळी दर एका तासाला लोकल धावेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.