Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Gold Rate Today Fall: आज जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे आजचे दर वाचा.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी घसरले

प्रति तोळ्यामागे १००० रुपयांची घसरण

वाचा आजचे सोने चांदीचे भाव

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईत अनेकजण सोनं खरेदी करतात. आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहेत. सोन्याच्या दरात मागच्या दोन दिवसांपासून घसरण होत आहे त्यानंतर आजदेखील भाव कमी झाले आहेत. सोन्याचे दर जरी घसरले असले तरीही ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत.

Gold Rate Today
Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात आज १ हजारांची घसरण झाली आहे तर चांदीचे दर ५ हजारांनी घसरले आहे. आज १ तोळा सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ६२ हजार २२२ रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ६७ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहेत. सोने चांदीचे भाव कमी झाले असले तरीही ते १ लाख ६० हजारांच्या पुढेच आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही.

Gold Rate Today
Todays Gold Rate : सोनं ₹१५०० नी घसरले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरापासून वाढत आहेत. सोन्याचे दर सर्वाधिक १.८० हजारांच्या घरात गेले होते. त्यानंतर आता मागच्या महिन्याभरात हे दर २० हजारांनी कमी झाले आहेत. भविष्यातदेखील सोन्याचे दर घसरतील, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. जर सोन्याचे दर घसरले तर खरेदीदारांना दिलासा मिळेल.

गुडरिटर्न्सनुसार सोन्याचे भाव (Gold Rate Today)

सध्याच्या गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,५९,६६० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,२७,७२८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १०,३०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,९६,६०० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

गुडरिटर्न्सनुसार, आज १ किलो चांदीचे दर २,७५,००० रुपये झाले आहेत. या दरात ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Rate Today
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com