Uran Crime : उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

man attacks on girl : उरणमध्ये पुन्हा खळबळ उडवणारी घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
Uran Crime News
Uran Crime NewsSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

नवी मुंबई : उरणमधून पुन्हा खळबळजनक घटना समोर आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरण ताजं असताना उरणमध्ये एका तरुणाने तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्हावा शेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. न्हावे गाव येथील प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी न्हावा शेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरणमध्ये २७ वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केलं आहे. न्हावे गावातील श्रद्धा नावाच्या डोक्यात रॉड टाकल्याची घटना घडली आहे. तिच्या गावात राहणाऱ्या प्रीतम म्हात्रे या मुलाने एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Uran Crime News
Amravati Crime : चक्क कारमधून गोवंशाची तस्करी; मध्यरात्रीच्या सुमारास अमरावतीमधील प्रकार

तरुणाच्या संतापजनक कृत्याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात प्रीतम म्हात्रे याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर न्हावा शेवा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. श्रद्धा हल्ल्यात गंभीर जखमी आहे. या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Uran Crime News
Uran Crime News: यशश्रीच्या मारेकऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देऊ; उरणकरांनी मोर्चा काढत केली मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उरणमध्ये २२ वर्षीय यशश्री शिंदेची हत्या करण्यात आली. हत्येनंतर उरण-पनवेल मार्गावर तिचा मृतदेह आढळला होता. तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आढळल्या होत्या. प्रियकरानेच यशश्रीची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर उरणकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com