Amravati Crime : चक्क कारमधून गोवंशाची तस्करी; मध्यरात्रीच्या सुमारास अमरावतीमधील प्रकार

Amravati News : गोवंश जातीच्या पशुधनाची तस्करी केली जात असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहे. रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे तसेच गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांची चोरी करून नेले जात असते.
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : रस्त्यावर मोकाट फिरत असलेल्या किंवा बांधून ठेवलेल्या पशुधनांची चोरी करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार अमरावतीच्या धामणगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोवंशाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर कार उभी करून त्यातून गोवंशाला टाकून नेले जात असल्याचे दिसून येत आहे. 

Amravati Crime
Rule Change: १ ऑगस्टपासून होणार ५ मोठे बदल; गॅस सिलिंडरपासून बँक खात्यावर परिणाम होणार, खिशालाही कात्री बसणार

गोवंश जातीच्या पशुधनाची तस्करी केली जात असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहे. रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे तसेच गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांची चोरी करून नेले जात असते. असे प्रकार उघडकीस आल्यानंतर (Police) पोलिसांच्या मदतीने पकडण्यात देखील आले आहे. तरी देखील याला पूर्णपणे आळा बसलेला नाही. त्यानुसार असाच एक प्रकार अमरावती (Amravati News) शहरात समोर आले आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांना स्कार्पिओ कारमध्ये टाकून नेले जात असल्याचे समोर आले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवंशाची तस्करी होत असतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला.

Amravati Crime
Gondia Rain Update : गोंदिया जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; तब्बल १२२.६ टक्के पाऊस बरसला, आठवडाभरापासून संततधार

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्टेशन परिसरामधील ही घटना आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओमधून गोवंशाची तस्करी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे धामणगावमध्ये पोलिसांची पेट्रोलिंग होते की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आधी देखील याच ठिकाणावरून गोवंशाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर देखील धामणगावमधून अनेकदा गोवंश तस्करीच्या घटना पुढे आल्या आहेत. तरी देखील कारवाई होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com