Gondia Rain Update : गोंदिया जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; तब्बल १२२.६ टक्के पाऊस बरसला, आठवडाभरापासून संततधार

Gondia News : जून महिन्यात पावसाने जिल्हावासीयांना चांगलेच नाराज केले. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली होती.
Gondia Rain Update
Gondia Rain UpdateSaam tv
Published On

शुभम देशमुख 

गोंदिया : यंदा विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस होत आहे. मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत सरासरी ५७७.६ मिमी पाऊस बरसला होता. त्याची १०४.२ एवढी टक्केवारी होती. मात्र यंदा सरासरी ६२४ मिमी पाऊस बरसला असून त्याची ११२.६ एवढी टक्केवारी आहे. मागील आठवडाभरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. 

Gondia Rain Update
Sangli Kolhapur Flood: सांगलीकरांना दिलासा! 'कृष्णे'च्या पाणी पातळीतील वाढ मंदावली, कोल्हापूरात 'पूराची' स्थिती काय? वाचा..

जून महिन्यात पावसाने जिल्हावासीयांना चांगलेच नाराज केले. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली होती. त्यात उकाड्याने सर्वांना हैराण करून सोडल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. (Farmer) शेतकरी फक्त दमदार पावसाचीच कामना करीत होते. अशात जुलै महिन्याचा पंधरवडा सुद्धा कोरडाच गेला. मात्र १९ तारखेपासून पावसाने एंट्री मारली व अवघ्या जिल्ह्याला धुऊन (Heavy Rain) काढले आहे. सर्वत्र हाहाकार माजविला आहे. 

Gondia Rain Update
Assembly Election 2024: मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरला; वसंत मोरेंविरोधात ठाकरेंचा विश्वासू शिलेदार मैदानात

गोंदिया (Gondia) जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरु आहे. या संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने एवढी मेहरबानी दाखविली की आठ दिवसांतच मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असुन यंदा चांगला उत्पन्न होण्याची असा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com