Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Pune Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील आदिवासी मुलांच्या सरकारी वसतिगृहात दूषित पाणी प्यायल्याने २० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले. काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पालकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
Pune Pimpari Chinchwad Moshi 20 Student PoisoningSaam Tv
Published On
Summary
  • मोशी येथील आदिवासी मुलांच्या सरकारी वसतिगृहात दूषित पाण्यामुळे २० हून अधिक विद्यार्थी आजारी

  • विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि मळमळ यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • वसतिगृहातील वॉटर फिल्टर नादुरुस्त असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

  • घटनेनंतर पालकांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली

गोपाळ मोघटणे, पिंपरी चिंचवड

Pune Pimpari Chinchwad Moshi 20 Student Poisoning पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दूषित पाण्यामुळे २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड मधील मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील दूषित पाणी प्यायल्याने विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले असले, तरी ८ ते १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला आहे. शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळूनही वसतिगृहातील वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे आम्हाला बाहेरचे पाणी प्यावे लागले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकर्‍यांना गुड न्यूज, तब्बल ₹१,८३७ कोटी जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का?

विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाकडे स्वच्छ पाण्याची मागणी केली होती. इतकी गंभीर घटना घडूनही आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्या मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com