Mumbai Water Cut from 30th May Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण मुंबईत उद्यापासून ५ टक्के पाणीकपात

Mumbai Water Cut from 30th May: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे ३० मेपासून मुंबईमध्ये ५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

Priya More

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये ३० मे म्हणजे उद्यापासून ५ टक्के पाणीकपात होणार आहे. तर येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्यामुळे पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात होणार आहे. पाणीकपात लक्षात घेता मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. पण २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. २९ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.७ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्यावर्षी याच दिवशी १५.१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.

मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासारख्या तलाव आणि धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.

पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी पालिकेकडून सूचना -

- दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.

- गरज आहे तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ करावी.

- नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

- घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे करावीत.

- वाहने धुण्यासाठी पाईप न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसावीत.

- घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत.

- आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकून देऊ नका.

- वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

- नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत ठेवा.

- नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा.

- उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेवढेच पाणी पिण्यासाठी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी.

- सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कुठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी.

- छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

- ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT