Mumbai Crime News: भयंकर! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार, मुंबईतील खळबळजनक घटना

Sexually Assaulting Minor Boy: सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
अल्पवयीन मुलावर अत्याचार
Sexually Assaulting Minor BoyYandex

मुंबईच्या उपनगरात सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी त्याच्या १५ वर्षीय साथीदाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 1 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. हा नऊ वर्षांचा मुलगा मित्रांसोबत त्याच्या घरी खेळत होता.

तेव्हा २४ वर्षीय आरोपी तरुण त्याच्याकडे गेला. त्याला काही कामाच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर तो त्याला सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पीडित मुलाने आरडाओरडा सुरू केल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्यानुसार मिळत (Mumbai Crime News) आहे. मुंबईमधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलगा घरी गेला अन् लपला. आता पुन्हा खेळायला कधीही बाहेर जाणार नाही, असं त्याने आईला सांगितलं. विश्वासात घेतल्यानंतर त्याने आईला घडलेली (Sexually Assaulting Minor Boy) घटना सांगितली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने थेट पोलीस ठाणं गाठलं. २ मे रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. याप्रकरणी अनैसर्गिक गुन्हा, प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि भारतीय दंड संहिता आणि मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत २ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला (Sexually Assaulting) आहे.

अल्पवयीन मुलावर अत्याचार
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपीला ओळखलं. एक पथक पाठवून त्याला ५ मे रोजी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या साथीदाराला देखील अटक (Crime News) केली आहे. आरोपींनी यापूर्वी देखील असं काही कृत्य केलं आहे का, याची पोलीस चौकशी करत आहेत.

अल्पवयीन मुलावर अत्याचार
Vijay Singh Revealed People Abuse: 'मला शिव्या दिल्या..', दोन वर्षांपासून बिग बॉसचा आवाज देणाऱ्या व्यक्तीला मिळताय धमक्या; नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com