Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला गळती; मुख्य मार्गाला किती धोका? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

CM Eknath Shinde : मुंबईतील कोस्टल रोडवर २५ ठिकाणी गळती लागली आहे. त्याची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मुख्य मार्गाला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे.
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadSaam Digital

कोस्टल रोड वर पाणी लिकेज होत असल्याची बातमी सामने दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडची पाहणी केली. कोस्टल रोडला काहीठीकाणी जॉइंट लीकेज आहेत, मात्र स्कॉटलंडच्या जॉन यांची भेट घेतल्यानंतर मुख्य मार्गाला कोणताही धोका नाही नसल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रोडवर २५ जॉइंट आहेत त्याठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर जॉइंट केले जातील विशिष्ट टेक्नॉलॉजीने काम केलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोस्टल रोडच्या गळतीवर कायमस्वरूपी सोल्यूशन काढलं जाईल. रहदारील कोणतीही बाधा नाही. घाटात मोठे टनेलमध्ये पण पाणी येते. मात्र हे कोस्टलचं पाणी थांबण्यासाठी काम केलं जाईल ते पण फुल प्रुफ. पावसाळ्यात पाणी येणार नाही अशी खात्री आहे. तसंच दुसरी लेन १० जून पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विरोधक म्हणतात की आधी उद्घाटन करणार, पण काम अर्धवट ठेवून नाही चालत. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे लक्षात आल्यावर कारवाई होत आहे . हे काम करताना रहदारी बंद करावी लागणार नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरही त्यांनी टीका करण्याचं टाळलं. प्रत्येकाला लाईफ स्टाईल आहे, मी मुख्यमंत्री आहे, त्यासाठी माझ्यावर जबाबदारी खूप आहे. कोण बाहेर जाऊन फिरायला गेलं हा त्यांचा प्रश्न आहे, असल्याचं ते म्हणाले.

Mumbai Coastal Road
CM Eknath Shinde Pre-Monsoon Review Meeting : CM एकनाथ शिंदेंनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; NDRF, SDRF च्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा वरळी ते मरिन ड्राइव्ह ११ मार्च रोजी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. या ११ किमीच्या पट्ट्यात २.०७ किमी लांबीचा टनेलही सेवेत आला आहे. पण याच टनेलमध्ये पाणी गळती होत असल्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल झाला होत आहे. यांची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी एलएनटीच्या अधिकाऱ्यांही होते.

Mumbai Coastal Road
Sambhajinagar Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत; ३०० फूट खोल दरीत उतरून आणावे लागतेय पाणी 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com