CM Eknath Shinde Pre-Monsoon Review Meeting : CM एकनाथ शिंदेंनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; NDRF, SDRF च्या बैठकीत काय झाली चर्चा?

monsoon update : मान्सूुन महाराष्ट्रात लवकर दाखल होणार असून मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यापार्श्वभूमीवर आज NDRF, SDRF सह महत्त्वाच्या विभागांची बैठक घेऊन सूचना केल्या.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Saam Digital

मान्सूला पोषक स्थिती तयार झाली असून जूनच्या ७ तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत भूस्खलनसारख्या घटना आणि मानवहानी टाळण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील यावर चर्चा करण्यात आली असून त्यानुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीला NDRF, SDRF सह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या केल्या सूचना?

अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

अडचणीच्या काळात इतर राज्यांशी संपर्क कसा करावा

लोकांना संकटात जागृत करण्याचा प्रयत्न कसा करावा

धोकादायक इमारतीतील लोकांचं स्थलांतरण कसं करता येईल

यावेळी राज्यातील दुष्काळाबाबतही सविस्तर चर्चा झाली. मदत व पंचनामा यावर चर्चा झाली. जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. आपत्तीजन्य परिस्थितीशी लढण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आजच्या बैठकीतील चर्चा झालेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी होणार असून संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde
MLC polls : लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी, महाविकास आघाडी, महायुतीकडून मोर्चेबांधणी

कोस्टल रोड वर पाणी लिकेज होत असल्याची बातमी सामने दिली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडची पाहणी केली. काहीठीकाणी जॉइंट लीकेज आहे मात्र स्कॉटलंडचे जॉन भेटले त्यांनी मेन रोडलां धोका नसल्याचं म्हटलं आहे.२५ जॉइंट आहेत त्याठिकाणी इंजेक्शन द्वारे पॉलिमर जॉइंट केले जातील विशिष्ट टेक्नॉलॉजीने काम केलं जाईल, अस त्यांनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics: विधानसभेत 'दादा'गिरी चालणार? अजित गटाला विधानसभेत हव्यात 80-90 जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com