MLC polls : लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी, महाविकास आघाडी, महायुतीकडून मोर्चेबांधणी

MLC Election News : निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात इच्छुकांसाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत.
लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी, महाविकास आघाडी, महायुतीकडून मोर्चेबांधणी
Maharashtra MLC Election Saam Tv

नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर उमेदवारीसाठी इच्छुकांकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेने कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झालेली नसताना किशोर दराडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

लोकसभेनंतर राज्यातील नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसताना दराडेंकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.

लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी, महाविकास आघाडी, महायुतीकडून मोर्चेबांधणी
MNS In MLC Elections News | विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आता मनसे लढणार

महायुतीकडून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे आणि कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिक्षक मतदारसंघासाठीट्या निवडणूक प्रक्रियेला ३१ मे रोजीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कोकण पदवीधर लढवणार

महाविकास आघाडीत कोकण पदवीधरची निवडणूक काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. मुंबईतील २ जागा ठाकरे गट लढणार आहे. तर काँग्रेस कोकण पदवीधर लढणार आहे. काँग्रेसकडून रमेश कीर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

भाजपकडून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी तातडीची बैठक

मुंबईत भाजप कोर कमिटीने आज तातडीच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत भाजपने बैठकीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता दादर येथील भाजपा कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी, महाविकास आघाडी, महायुतीकडून मोर्चेबांधणी
Kapil Patil News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा; काय आहे प्रकरण?

मुंबई शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे इच्छुक

मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे इच्छुक आहेत. शिवाजी शेंडगे स्वतः शिक्षक आहेत. ते शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून शेंडगे यांची ओळख आहे. शेंडगे यांनी २०१८ साली मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com