Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती; महत्वाचे मतदारसंघ अन् उमेदवारांची यादी बघा

Lok Sabha Elections 2024 Phase 7 Candidates Details: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात दिग्गज नेत्यांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती; महत्वाचे मतदारसंघ अन् उमेदवारांची यादी बघा
Lok Sabha Elections 2024 Phase 7 Candidates and Constituency ListSaam TV

देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे एकूण ६ टप्पे पार पडले. आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. एकूण ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात मतदान होईल. या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. त्यात मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती; महत्वाचे मतदारसंघ अन् उमेदवारांची यादी बघा
PM Narendra Modi : आता खेळातही मुस्लिमांसाठी वेगळा कोटा ठेवणार का? PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?

लोकसभेच्या अंतिम टप्प्यात बिहार (८ जागा), चंदीगड (१ जागा), हिमाचल प्रदेश (४ जागा), झारखंड (३ जागा), ओडिशा (६ जागा), पंजाब (१३ जागा), उत्तर प्रदेश (१३ जागा) येथे मतदान होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील ९ जागांसाठी एकाच वेळी मतदान होईल. यासाठी एकूण ९०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दिग्गज उमेदवारांमध्ये होणार चुरशीच्या लढती

लोकसभेचा शेवटचा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण, या टप्प्यात एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील महत्वाच्या लढती (UP Lok Sabha Constituencies and Candidates)

  • वाराणसी : नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काँग्रेस)

  • गोरखपूर : रवी किशन (भाजप) विरुद्ध काजल निषाद (सपा)

  • गाझीपूर : अफजल अन्सारी (सपा) विरुद्ध पारस नाथ राय (भाजप)

  • मिर्झापूर : अनुप्रिया पटेल (एडीएस)

  • चांदौली : महेंद्र नाथ पांडे (भाजप)

बिहारमध्ये महत्वाच्या लढती (Bihar Lok Sabha Constituencies and Candidates)

  • पटना साहिब : रविशंकर प्रसाद (भाजप)

  • पाटलीपुत्र : मीसा भारती (आरजेडी) विरुद्ध राम कृपाल यादव (भाजप)

हिमाचल प्रदेशातील महत्वाच्या लढती

  • कांगडा : आनंद शर्मा (काँग्रेस)

  • मंडी : कंगना रणौत (भाजप) आणि विक्रमादित्य सिंग (काँग्रेस)

  • हमीरपूर : अनुराग ठाकूर (भाजप)

पंजाबमधील महत्वाच्या लढती

  • अमृतसर : तरनजीत सिंग संधू (भाजप)

  • जालंधर : चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) विरुद्ध सुशील कुमार रिंकू (भाजप)

  • लुधियाना : अमरिंदर सिंग राजा वारिंग (काँग्रेस) आणि रवनीत सिंग बिट्टू (भाजप)

  • भटिंडा : हरसिमरत कौर बादल (एसएडी) विरुद्ध गुरमीत सिंग खुदियान (आप)

  • पटियाला : प्रनीत कौर (भाजप) विरुद्ध धरमवीर गांधी (काँग्रेस) आणि बलबीर सिंग (आप)

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती; महत्वाचे मतदारसंघ अन् उमेदवारांची यादी बघा
Loksabha Election: सरकार येताच एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात टाकणार ८५०० रुपये: राहुल गांधींची घोषणा

पश्चिम बंगालमधील महत्वाच्या लढती

  • डायमंड हार्बर : अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

  • कोलकाता उत्तर : तापस रॉय (भाजप) विरुद्ध सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस)

  • बारासात : काकोली घोष दस्तीदार (तृणमूल काँग्रेस) विरुद्ध स्वपन मजुमदार (भाजप)

  • बशीरहाट: रेखा पात्रा (भाजप) विरुद्ध हाजी नुरुल इस्लाम (तृणमूल काँग्रेस)

झारखंडमधील महत्वाच्या लढती

  • दुमका: सीता सोरेन (भाजप) विरुद्ध नलिन सोरेन (जेएमएम)

  • गोड्डा : निशिकांत दुबे (भाजप)

चंदीगड एका जागेसाठी चुरशीची लढत

चंदीगड: मनीष तिवारी (काँग्रेस) विरुद्ध संजय टंडन (भाजप)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com