PM Narendra Modi : आता खेळातही मुस्लिमांसाठी वेगळा कोटा ठेवणार का? PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

PM Narendra Modi latest Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. मोदींनी 'एनआय' वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ही टीका केली.
मोदींची घणाघाती विरोधकांवर टीका
PM Narendra ModiSaam tv

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. या शेवटच्या टप्प्यातही सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या दरम्यान 'एनआय' वृत्तसंस्थेला मुलाखत देताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी अल्पसंख्यांकातील जातींना ओबीसीमध्ये सामाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली.

मुस्लिम अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मुद्यावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आपण आता खेळातही मुस्लिमांसाठी वेगळा कोटा ठेवणार का, पंजाब, उत्तर प्रदेश पश्चिम बंगालमधील तरुण खेळात प्राविण्य आहेत. तरुण मंडळी खेळासाठी आयुष्यातील १० वर्ष घालवतात. आता हे म्हणतात की, हा कोटा मुस्लिमांना लागू होईल. त्यामुळे या तरुणांचं नुकसान होईल. देशातील टेंडरमध्ये विरोधक अल्पसंख्याकासाठी आरक्षण लागू करणार आहेत'.

मोदींची घणाघाती विरोधकांवर टीका
Pm Modi Interview: राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना पाकिस्तानचं समर्थन; चौकशी झाली पाहिजे PM मोदी

'धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास नुकसान झाल्यास कोण जबाबदार राहील. मतपेढीसाठी पीढीला बरबाद करू इच्छित आहेत. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की, मी दलित, आदिवासी ओबीसी समाजासाठी लढाई लढत आहे, असे मोदी म्हणाले.

'कोलकाता हायकोर्टाने मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द केलं. मुस्लिममधील जातींना ओबीसी बनवलं. ओबीसींचं हक्क लुटले. याच्या विरोधात निवडणुकीदरम्यान आम्ही त्यावर बोट ठेवलं. हायकोर्टाचा निकाल आला, तेव्हा स्पष्ट झालं. आता ते कोर्टावर टीका करत आहे. त्यांची ही बाब स्वीकारण्यासारखी नाही, असे मोदी पुढे म्हणाले.

वैयक्तिक टीकेवर बोलताना मोदी म्हणाले, मी मागील २४ वर्षांपासून शिव्या खात आहे. विरोधकांकडून शिव्या दिल्या जात आहेत. निवडणूक आणि निवडणुका नसतील तरी, विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळे शिव्या देत आहेत'.

मोदींची घणाघाती विरोधकांवर टीका
Maharashtra Politics 2024 : 'गडकरींना पाडण्यासाठी मोदी-शाहांचे प्रयत्न'; 'फडणवीसांनी पुरवली रसद', संजय राऊतांच्या आरोपांमुळे काँग्रेसचाही संताप

ईडीच्या गैरवापराच्या आरोपावर मोदी म्हणाले, हा खरंतर कचरा आहे. तो आमच्यावर फेकला जात आहे. आता गावाच्या चेकबुकवर सरपंचाला सही करण्याचा अधिकार आहे. पण पंतप्रधानांना नाही. माझं सरकर भ्रष्टाचार सहन करणारं नाही. या बाबी कार्यालयात बसणाऱ्या लोकांच्या हातात आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com