Mumbai, Konkan Weather Forcast: गुड न्यूज! वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?

IMD Rain/Weather Forecast For Mumbai and Konkan: वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना एक सुखद बातमी हाती आलीय. मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याबाबत आयएमडीने नवी अपडेट दिलीय.
Mumbai, Konkan Weather Update: गुड न्यूज! वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?
Mumbai and Konkan Rain NewsSaam TV

मे महिन्याच्या सुरुवातीपासून सूर्य आग ओकत आहे. उष्षणतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे, याचदरम्यान हवामान विभागाने मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिलीय. मान्सून कधी येणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. याचदरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) या प्रश्नाचे उत्तर दिलंय. हवामान खात्यानुसार मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.

कुठपर्यंत आला मान्सून

हवामान विभागानुसार, नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचले आहेत. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. यानुसार मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमार्गे लक्षद्वीपमार्गे केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.

मुंबईत कधी येणार मान्सून

इंडियन एक्स्प्रेसने आयएमडी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत १० जूनपासून मान्सूनचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो १० ते ११ जून दरम्यान मुंबईत पोहोचेल, असे या अहवालात नमूद करण्यात आलंय. साधारणपणे, मान्सून साधारणपणे ११ जून रोजी मुंबईत दाखल होतो, गेल्या वर्षी, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे दोन आठवडे उशीर झाला होता.

कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल

मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरुवात झालीय. मान्सून कधी येणार यांचे मच्छिमार ठोकताळे बांधत असतात. मान्सून सक्रिय होण्याच्या काही दिवस समुद्र किनारी फेणीचे पाणी दिसते. त्यानुसार आता समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर फेणी दिसू लागलीय.

Mumbai, Konkan Weather Update: गुड न्यूज! वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?
Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com