Mumbai Water Supply: धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही

BMC Not Planning Water Cut: धरणातील पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेकडून पाणीकपातीबाबत कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.
Mumbai Water Supply:  धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही
Mumbai Water SupplySaam TV
Published On

मे महिना संपत आला. वाढत्या तामनामुळे हैराण झालेले मुंबईकर आता मान्सूनची (Monsoon 2024) आतुरतेने वाट पाहत आहेत. पण नैऋत्य मान्सून मुंबईमध्ये येण्यासाठी अजून २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. अशामध्ये मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण मुंबई शहराला पाणीपुरवठा (Mumbai Water Issue) करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीसाठ्यामध्ये दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेकडून पाणीकपातीबाबत कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबई शहराला पाणी पुरवठा होतो. या सातही धरणांमधील पाणीपातळीत १०.२८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या धरणांमधील पाणीपातळी ही गेल्या ३ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

Mumbai Water Supply:  धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही
Mumbai Water Stock: मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट; पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये पाणीकपातीबाबत कोणतीही त्वरित योजना नाही. ते या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख ११ जून आहे. त्यामुळे मान्सून यायला २० पेक्षा अधिक दिवस शिल्लक आहे. पण मान्सूनला आणखी विलंब लागला तर ३ वर्षांतील नीचांकी पातळीसह पाणीकपात लागू करण्यास मुंबई महानगर पालिकेला भाग पाडले जाऊ शकते.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठी हा १.४८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच आवश्यक पातळीच्या १०.२९ टक्के इतका आहे. मागच्या वर्षी म्हणजे २०२३ ला याच दिवशी या धरणांमधील पाणीसाठा २.३१ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच १६ टक्के इतका होता. तर २०२२ मध्ये या धरणांमधील पाणीसाठा २.९८ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच २०.६३ टक्के इतका होता.

Mumbai Water Supply:  धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही
Mumbai Accident News: पुणे पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अपघात; दुचाकीच्या धडकेत ३२ वर्षीय तरूणाचा मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराची तीन दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी १ टक्के पाणीसाठा जवळपास पुरेसा आहे. यावर्षी सात धरणांमधील पाणीसाठी सुरूवातीपासूनच मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाने भातसा आणि अप्पर वैतरणा येथील अतिरिक्त राखीव पाणीसाठ्यासाठी बीएमसीची विनंती मान्य केली होती.

बीएमसी दररोज मुंबईसाठी ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याची व्यवस्था करते. मुंबईला भातसा धरणातून ४८ टक्के, अप्पर वैतरणा धरणातून १६ टक्के, मध्य वैतरणा धरणातून १२ टक्के, मोडक सागर धरणातून ११ टक्के आणि तानसा धरणातून १० टक्के पाणी पुरवठा केला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतमध्ये असलेल्या तुळशी आणि विहार तलावातून मुंबईला एकूण २ टक्के पाणीपुरवठा केला जातो.

Mumbai Water Supply:  धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू; आईसह दूसरे बाळ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com