Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू; आईसह दूसरे बाळ जखमी

Mumbai Bangalore Highway: रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सेंटोसा हॉटेल समोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका चार चाकी वाहन चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
baby passed away two injured in a car accident near pimpri chinchwad
baby passed away two injured in a car accident near pimpri chinchwadSaam Digital

पिंपरी चिंचवड शहरात आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास झालेल्या चार चाकी वाहनाच्या अपघातात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या दाेघांना एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रावेत पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सेंटोसा हॉटेल समोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका चार चाकी वाहन चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चार चाकी वाहन ट्रकच्या मागील बाजूस धडकले. या धडकेत एका एक महिन्याच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

baby passed away two injured in a car accident near pimpri chinchwad
Wadange Bandh Kolhapur : वडणगे गावात कडकडीत बंद, काेल्हापूर पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

हा अपघात झाला त्यावेळी शिरगाव पंधरवडी येथील रहिवासी असलेली एक महिला तिच्या एक महिन्याच्या आणि एक दीड वर्षाच्या बाळाला घेऊन हॉस्पिटल मधून परत घराकडे जात असताना ही घटना घडली. या अपघातात जखमी वाहन चालक आणि मायलेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

Edited By : Siddharth Latkar

baby passed away two injured in a car accident near pimpri chinchwad
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com