hindutvavadi sanghatana calls wadange bandh today
hindutvavadi sanghatana calls wadange bandh todaySaam Digital

Wadange Bandh Kolhapur : वडणगे गावात कडकडीत बंद, काेल्हापूर पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

wadange bandh : या बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडणगे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात शुकशुकाट जाणवत आहे.
Published on

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे गावात आज (शुक्रवार) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. काही जागा वक्फ बोर्डाला देण्याचा डाव असल्याचा आराेप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान वडणगे गावात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त दिसून येत आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानूसार वडणगे गावाचे ग्रामदैवत महादेव मंदिराशेजारील जागा तसेच दुकानदारांचे गाळे आणि शिव पार्वती तलावा जवळील दोन एकर जागा वक्फ बोर्डाला देण्याचा डाव रचला जात आहे. यामुळे ग्रामस्थ नाराज झाले आहेत.

hindutvavadi sanghatana calls wadange bandh today
POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

दरम्यान आज वडणगे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. वडणगे गावात सकाळपासून सर्व व्यवहार बंद असल्याचे दिसून येत आहे. या बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

hindutvavadi sanghatana calls wadange bandh today
Sangli: अनधिकृत होर्डिंग लागल्यास आता दंड, कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com