Mumbai Accident News: पुणे पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अपघात; दुचाकीच्या धडकेत ३२ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Latest Accident News: मुंबईत अल्पवयीन मुलाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
अपघात
Mumbai Accident NewsSaam Tv

पुणे पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत देखील अशीच एक घटना घडली आहे. माझगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या स्कुटरच्या धडकेत एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी (२३ मे) सकाळी घडली आहे. माझगाव येथील नेसबिट पुलावर गुरुवारी सकाळी १५ वर्षीय मुलगा स्कूटर चालवत होता. त्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली (Mumbai Accident News) आहे. या अल्पवयीन मुलाला डोंगरी येथील बालगृहात पाठवण्यात आल्याची माहिती टाईम्य ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. जे जे मार्ग पोलिसांनी मृताची ओळख पटवली आहे. इरफान शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. तो पीडी मेलो रोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. इरफान शेख नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असल्याची माहिती मिळत आहे.

या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने नाश्त्याचं सामान आणण्यासाठी वडिलांची दुचाकी घेतली होती. तो घराबाहेर पडला होता. गुरूवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास शेख आणि अल्पवयीन मुलगा दोघेही आपापल्या दुचाकीवरून विरूद्ध दिशेने जात होते. तेव्हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटर चालवणारा दहावीचा विद्यार्थी मद्यधुंद (Accident News) अवस्थेत दिसत नव्हता. परंतु त्याच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.

अपघात
Pune Porsche Car Accident: पोर्शेमध्ये तांत्रिक बिघाड ते मुलाकडे गाडी देण्याची सूचना; विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!

तर मृत इरफान शेखने अलीकडेच ऑनलाइन कपड्यांची विक्री सुरू केली (Mumbai News) होती. यापूर्वी तो बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करत होता. दुचाकीवरून आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने दिलेल्या धडकेत (Nesbit Bridge) इरफान नवाब अली शेख या व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला जेजे रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अपघात
Pune Car Accident: 'बिल्डर का बेटा हूँ इसलिए बेल मिल गयी', 2 जणांचा बळी घेतल्यानंतर आरोपीचं रॅप साँग; संतापजनक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com